.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
खालापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र खालापूरातील 49 हजार 517 बहिणींच्या नावावर चारचाकी नोंदणी आहे का? याची आता तपासणी होणार असून तसे आढळल्यास लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये हप्ता बंद होणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्था पसरली आहे.सरकारने निवडणुकीपुरते पैसे देऊन नंतर फसविले अशी भावना आता निर्माण होऊ लागली आहे.
महायुती सरकाराने विधानसभा निवडणुकीपूर्वी आणलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी जेवढ्या फायद्याची ठरली तेवढ्यात फायद्याची महायुतीला देखील ठरल्याचे विधानसभा निकालानंतर दिसून आले. योजनेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.खालापूर तालुक्यातही महिलांनी याचा फायदा घेतला.
राज्य सरकारने लाडकी बहीण अर्ज छाननीचे नवीन निकषाप्रमाणे तपासणी सुरू केली आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम असलेल्या सधन बहिणींना योजनेचा मिळत असलेला लाभ बंद होणार असून या निकषांपैकी स्वतःच्या नावावर चार चाकी असल्यास लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. आरटीओ कडून तशा प्रकारची माहिती मागविण्यात आली असून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या बहिणींची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात खालापूर तालुक्यातील लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे. काही ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ स्वतःहून सोडण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे .परंतु खालापूर तालुक्यात 49हजार 517 लाभधारकांपैकी एकहि बहिणीचा अर्ज माघारी साठी आला नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. ज्या बहिणी या योजनेत बसणार नाहीत त्यांनीही आता योजनेचा लाभ मिळणार नाही,असे मनोमन जाणले.
खालापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात नारीशक्ती दूत अॅप असताना 28 हजार 206 अर्ज शासनाला प्राप्त झाले होते. यामध्ये पडताळणी होऊन 921 अर्ज अपात्र ठरले होते. 27 हजार 285 पात्र बहिणींना पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळाले . दुसर्या टप्प्यात नोंदणीमध्ये 20 हजार 348 अर्ज खालापूर तालुक्यातून लाडकी बहिण योजनेसाठी आले असून त्यातील 116 अर्ज अपात्र ठरले.