Konkan Water Shortage: कोकणातील 173 धरणांमध्ये 41 टक्के जलसाठा शिल्लक; मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची चिन्हे

कोकणात एकूण 173 धरणे असून त्यामध्ये 11 मोठे, 08 मध्यम, 154 लघु धरण प्रकल्प आहेत.
Konkan Water Shortage
Konkan Water ShortagePudhari
Published on
Updated on

जयंत धुळप

रायगड: भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, एप्रिल आणि मे महिन्यात कोकणात तापमानाचा पारा 41 ते 42 अंशापर्यंत पोहोचला आहे. कोकणात दमट हवामानामुळे जाणवणारी उष्णता प्रत्यक्षातील तापमानापेक्षा जास्त आहे.त्याच बरोबर वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने धरणांती साठ्यांतील जलसाठ्यांमध्ये झपाट्याने घट होत असल्याने कोकणातील पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होत आहे.

कोकणात एकूण 173 धरणे असून त्यामध्ये 11 मोठे, 08 मध्यम, 154 लघु धरण प्रकल्प आहेत. या सर्व म्हणजे 173 धरणांमध्ये 4 मे रोजी या सर्वधरणांमध्ये 41.19 टक्के जलसाठा शिल्लक असून यंदा मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

कोकणातील 173 धरणांमध्ये 11 मोठे धरण प्रकल्प असून, या सर्व धरणांमध्ये 39.86 टक्के म्हणजे 1024.21 द.ल.घ.मी. पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षी हाच जलसाठा 37.93 टक्के होता.गतवर्षीच्या तुलनेत हा शिल्लक जलसाठा 2.55 टक्क्याने अधिक आहे.

Konkan Water Shortage
CCTV Cameras: महाड शहरातील ‌‘तिसरा डोळा‌’च झालाय बंद

कोकणात 8 मध्यम धरण प्रकल्प असून, या आठ धरणांमध्ये 47.03 टक्के म्हणजे 283.70द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे.गतवर्षी हा जलसाठा 45.06 टक्के होता. कोकणात 154 लघु प्रकल्प असून या सर्व लघुप्रकल्पांमध्ये एकुण 41.31 टक्के म्हणजे 229.62 द.ल.घ.मी.जलसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी हा जलसाठा 56.60 टक्के होता. यंदा 15.29 टक्क्याने पाणी साठ्यात घट झाली असल्याने आगामी दिवसात त्यांचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पालघर जिल्ह्यात एकुण तीन धरण प्रकल्प आहेत. यातील मध्य वैतरणा धरणात सद्यस्थितीत 60.89 द.ल.घ.मी. म्हणजे 31.46 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी याच दिवशी तो 27.11 टक्के शिल्लक होता. उर्ऱ्वरित दोन धरणांमध्ये धामणी धरणात 107.57 द.ल.घ.मी.म्हणजे 35.68 टक्के तर कवडास वळण बंधारामध्ये 8.28 द.ल.घ.मी.म्हणजे 45.58 टक्के जलसाठा शिल्लक आहे.रायगड जिल्ह्यातील डोलवहाळ मध्ये 13.46 द.ल.घ.मी.म्हणजे 80.46 टक्के तर सिंधुदूर्गमधील तिल्लारी धरणात 180.95 द.ल.घ.मी. म्हणजे 37.14 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Konkan Water Shortage
Summer Wedding Delay Issues: वैशाख वणव्याचा चटका आणि टळणारे विवाह मुहूर्त; वऱ्हाडी मंडळीना होतोय मनस्ताप

ठाणे जिल्ह्यातील सहा धरण प्रकल्पातही घटती जलपातळी

ठाणे जिल्ह्यातील सहा महत्वाच्या धरणांपैकी निम्न चोंड धरणाच्या जलपातळीत गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. या धरणात सद्यस्थितीत 0.72 द.ल.घ.मी.म्हणजे 26.37 टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हा 30.51 टक्के होता. उर्वरित धरणांत बारवी धरणात 133.12 द.ल.घ.मी.म्हणजे 38.80 टक्के, भातसा धरणात 438.86 द.ल.घ.मी.म्हणजे 42.97 टक्के ,मोडकसागर धरणात 120.48 द.ल.घ.मी.म्हणजे 51.66 टक्के, तानसा धरणात 58.65 द.ल.घ.मी.म्हणजे 32.53 टक्के तर ऊर्ध्व घाटघर धरणात 2.79द.ल.घ.मी.म्हणजे 54.28 टक्के जलसाठा शिल्लक आहे. ग्रामस्थांना दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news