

खोपोली शहर : रायगडात सर्वत्र स्मार्ट मीटरला विरोध होत असताना खोपोली वीज वितरण कंपनीच्या आधिकार्यानी शहरातील नीलकंठ व्हॅली या गृहसंकुलात चार दिवसांपूर्वी रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेचे काम हाती घेतल. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ही प्रक्रिया थांबली असली तरी पुढील काळात स्मार्ट मीटरचा प्रश्न खोपोलीत पेटणार या ठिणगी वरून नक्की होत आहे.
सोसायटीमधील रहिवाशांनी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत आमचे मीटर सुस्थितीत असताना हे मीटर बदलण्याचे कारण काय? असा सवाल विचारत शासनाच्या परिपत्रकाची मागणी केली.
वीज कंपनीची वसुलीचे प्रमाण चांगले असताना शहरातील मुख्य विद्युत वाहिन्या पूर्णपणे जीर्ण झाल्या आहेत. ते बदलण्याचे सोडून ग्राहकांना चांगली सेवा देण्याबाबतीत कोणतीही ठोस उपाययोजना अंमलात न आणता स्मार्ट मीटर बसविण्याचा घाट का? वीज वितरण कंपनी दांडेलशाही करुण आदाणीच्या घशात घालून ग्राहकांचा खिसा कापणार असल्याचा आरोप केला.
याबाबतीत खोपोली वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी वाघमोडे हे स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ठाम असल्याने वातावरण तापले. यावेळी खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन हिरे यांनी मध्यस्ती करीत महावितरण कंपनने कायदेशीर व योग्य बाबतीतील पूर्तता करुन निर्णय घ्यावा पोलिसांच्या हस्तेक्षेपा नंतर तणावपूर्ण परिस्थिती निवळली,