Kharpada Toll: खारपाडा टोल बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार; भरत गोगावले यांची माहिती

अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, हा विषय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चेला आला असल्याचं गोगावलेंनी सांगितले.
bharat gogawale
bharat gogawalePudhari
Published on
Updated on

अलिबाग: गणेशोत्सव तोंडावर आला असताना खारपाडा टोलनाका बंद करण्याची मागणी जोर धरतेय. याबाबत पालकमंत्री भरत गोगावले यांनी उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून टोल थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “रस्ता पूर्ण झाला, बिनधास्त टोल घ्या, आमचा विरोध नाही,” असे म्हणत अपूर्ण रस्त्यासाठी टोल आकारण्यास गोगावलेंनी विरोध दर्शवलाय.

bharat gogawale
Murud Coconut Farmers: मुरुडमधील नारळ बागायतदार नैराश्‍येच्या छायेखाली; माकडांचा उच्छाद

दरम्यान, त्यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी रोह्यात अधिक लक्ष देणार असल्याचे आणि म्हसळ्याची हंडी फोडणार असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी विकास गोगावले हे विकासकामांच्या संदर्भातच बोलले आहेत, दुसरं काही नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आले असल्यास त्यांच्या भागातही विकासकामांसाठी निधी दिला जाईल, असं त्यांनी सांगितले.

तर कर्जतमधील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याच्या तक्रारीवर भरत गोगावले यांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय. याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, हा विषय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चेला आला असल्याचं गोगावलेंनी सांगितले.

bharat gogawale
Mahad Paddy Bonus: खरेदी-विक्री संघात विकलेल्या भाताचा बोनस रखडला

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र महामार्गावर टोल वसुली सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यातील नागरिकांसह कोकणवासियांमध्ये नाराजी आहे. महामार्गावर सध्या टोल वसुली बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news