Khargar Crime | ‘मी कोण आहे....Don!’ म्हणत खारघर मध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ..

पोलिस आरोपींच्या शोधात, दहशत निर्माण करणारी भाषा व्हिडीओत
Khargar Crime
Khargar Crime | ‘मी कोण आहे....Don!’ म्हणत खारघर मध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला;
Published on
Updated on

पनवेल : खारघर परिसरात एका तरुणावर अज्ञात इसमाने केलेल्या बेदम मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. “मी कोण आहे Don… माझा मर्डर करणार का?” अशी दहशत निर्माण करणारी भाषा वापरत आरोपीने तरुणावर लाठी-काठी, चप्पल तसेच हातापायांनी प्राणघातक हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वी खारघरमधील एका गजबजलेल्या भागात घडली. किरकोळ वादातून सुरुवात झालेला हा प्रकार अचानक उग्र झाला आणि आरोपी इसमाने संतापाच्या भरात तरुणाला रस्त्यावरच बेदम मारहाण सुरू केली. हातात लाठी-काठी घेत त्याने वारंवार प्रहार केले, तर कधी चप्पल काढून मारहाण केली. आसपास उपस्थित काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीच्या आक्रमक पवित्र्यामुळे कोणीही पुढे येण्याचे धाडस करू शकले नाही.

या मारहाणीचा व्हिडिओ काही प्रत्यक्षदर्शींनी मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रकरणाची गंभीरता समोर आली. व्हिडिओमध्ये आरोपी स्वतःला “Don” संबोधत, “मी कोण आहे माहिती आहे का? माझा मर्डर करणार का?” अशी उघड धमकी देताना ऐकू येतो. या धमकीमुळे पीडित तरुणासोबतच त्याच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. “तक्रार केलीस तर संपवून टाकीन,” असे शब्द वापरून आरोपीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही काळ पीडित कुटुंब भयभीत अवस्थेत होते. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार लपून राहू शकला नाही आणि अखेर प्रकरण उघडकीस आले.

स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. खारघर सारख्या सुशिक्षित आणि वेगाने विकसित होत असलेल्या उपनगरात अशा प्रकारची गुंडगिरी उघडपणे होत असल्याने नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. “रस्त्यावर उभे राहून कोणी स्वतःला Don म्हणत मारहाण करणार असेल, तर सामान्य माणसाने सुरक्षित कसे राहायचे?” असा सवाल परिसरातील रहिवाशांनी केला आहे. या घटने बाबत खारघर पोलिसांना माहित नसल्याचे समोर आले आहे,.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news