Raigad Monsoon tourism : खाडीपट्ट्यातील खैरे डॅमची तरुणाईला भुरळ

मात्र तालुका प्रशासनाच्या बंदी आदेशामुळे पर्यटकांमध्ये हिरमोड
Raigad Monsoon tourism
Raigad Monsoon tourismpudhari photo
Published on
Updated on

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खाडीपट्टयातील नद्या, ओढे, नाले तसेच धबधबे देखील ओसांडून वाहू लागले आहेत. सध्या खाडीपट्टयातील नैसर्गिक वातावरण आल्हादायक झाले असून निसर्ग सानिध्यात असलेले खैरे डॅम सद्या भरले असल्याने तेथील खळखळ धावणारा धबधबा कोसळू लागल्याने तरुणाईचे ते सद्या आकर्षण बनले आहे. याठिकाणी येणाऱ्या तरुणाईची उत्सुकता वाढली आहे, मात्र बंदी आदेशामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये हिरमोड पसरलेला पाहायला मिळत आहे.

आता स्वभाविक शहरी पर्यटकांचा ओघ देखील येथील धबधब्याकडे सुरु होऊ शकला असता. येथील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांसह शहरी भागातील पर्यटक याठिकाणी येऊन मनमुराद आनंद लुटत होते. शनिवार, रविवार किंवा सलग सुट्टया आल्या की स्थानिक मोठया प्रमाणात याठिकाणी गर्दी करत असत.

Raigad Monsoon tourism
Raigad News : पावसाच्या प्रचंड प्रवाहात पूल खचला

सदर धबधबा हा उंचावरुन कोसळणारा नसून, तर खैरे धरणातून हे पाणी वाहून येते, मात्र ते थोडया अंतराच्या उंचीवरुन वाहत असल्यामुळे खडकावर आपटून फेसाळत असल्यामुळे त्या पाण्यावर मनमुराद आनंद लुटता येतो आणि सुरक्षिततेचा विचार केला असता दगड पडण्याची कोणतीही भीती या ठिकाणी नाही, त्यामुळे कोणताही धोका संभावत नाही. त्यामुळे याठिकाणी यापूर्वी नेहमीच मोठी गर्दी आढळून येत होती.

गेल्या काही वर्षांपासून धबधब्यावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे धबधबे बंद करण्यांत आलेले आहेत. मात्र, हा धबधबा लहान आणि सुरक्षित असल्यामुळे खाडीपट्टयातील स्थानिक नागरिक तसेच मुंबई, पूण्यातून येणारी स्थानिक चाकरमानी मंडळी देखील आपल्या परिवारासह मोठया प्रमाणात या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटायला येत असत.पावसाळा सुरु झाल्यापासून ते अगदी गणपती सणापर्यंत याठिकाणी धबधबा हौशींची गर्दी पाहायला मिळत असायची.

Raigad Monsoon tourism
Palghar tribal development : मरणानंतरही मरणयातना! पूरातून प्रेतयात्रेचा प्रवास; नदीवर पुलाअभावी दुर्गम भागातील नागरिकांची फरपट

महाड शिरगाव फाटयापासून पुढे खाडीपट्टयातील रोहनफाटया जवळून वलंग रस्त्यामार्गे अवघ्या तीन-चार किलोमीटर अंतरावर असलेला खैरे डॅम आणि त्याचे वाहणारे फेसाळत व फवारासारखे उडणारे पाणी धबधबा स्वरुपी सद्या फेसाळून वाहत आहे. स्थानिक नागरिक तसेच सुट्टीच्या दरम्यान येणारी चाकमानी मंडळी मनसोक्तपणे आनंद लुटण्यासाठी निसर्गरम्य धबधब्याच्या, धरणाच्या सानिध्यात येऊन मस्तपैकी वर्षा सहलीचा आनंद घेत असायची.

सुरक्षेमुळे आले निर्बंध

काही वर्षांपासून धबधब्यावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे धबधबे बंद करण्यांत आलेले आहेत. याच सुरक्षेतेच्या आणि नियमामुळे या ठिकाणी सुद्धा स्थानिकांसह पर्यटक येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवावे असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे नाही. त्यामुळे पावसाळ्यात खुलणाऱ्या येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मनमुराद आनंद लुटता येतो. मात्र बंदी आदेशामुळे स्थानिकांमध्ये हिरमोड पसरलेले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news