Kashid Beach Tragedy: जळगावच्या तरुणाचा काशीद बीचवर बुडून मृत्यू

या प्रकरणी मुरुड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Kashid Beach Tragedy
Kashid Beach TragedyPudhari
Published on
Updated on

अलिबाग: मुरुडनजीक काशीद बीचवर सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले.

अमीन मजीद शेख (वय २५), मलिक नजीर शेख (वय २१) आणि इम्रान अन्वर खान (वय ३७, सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरुड परिसरात आले होते. मोकळ्या वेळेत ते काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले असता अमीन आणि मलिक हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले.

Kashid Beach Tragedy
11th Admission: मुंबईत सर्वाधिक १ लाख ७३ हजार २२३ अर्ज लॉक; राज्यातील ६ लाख ८० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिसांचे कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. मात्र अमीन शेख याला वाचविण्यात यश आले नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी मुरुड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news