

नेरळ : कर्जत तालुक्यातील रस्त्यावरील पडलेल्या खड्डयांची दयनीय अवस्था पाहाता प्रशासनाच्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा चव्हाट्यावर आला आहे. विकासाच्या चर्चेच्या तोफा थंडावल्याचे चित्र समोर येत असुन, पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पांच्या आगमणा पूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून या खड्ड्यांचा बंदोबस्त केला जाईल का? की गणपती बाप्पांच्या आगमण हे या खड्ड्यांमधून करावे का? असा संतप्त सवाल हा कर्जत तालुक्यातील करदात्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर गणपती आगमनापूर्वी रस्त्यांची कामे बांधकाम विभागाने केली नाही तर होणार्या आंदोलनास कर्जत शहर बचाव समितीचा जहीर पाठींबा असल्याचे ही जाहीर करण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील ररस्त्यांच्या दयनीय अवस्थेतून व खड्डयांच्या अतिक्रमणांतून मात्र करदात्या नागरिकांना जीवघेणा प्रवास करण्याची व विकतचे शारीरिक दुखणे घेण्याची तर होणार्या वाहतूककोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत व करदात्याच्या कराच्या पैशातून केलेल्या रस्त्यांच्या कामावर झालेले अतिक्रम पाहता शासन व प्रशासनाच्या या रस्त्यांच्या कामाचा दर्जा देखील चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत बांधकाम विभाग पुर्णपणे उदासिन आहे. गेंड्याच्या कातडीच्या बांधकाम प्रशासनाला सर्वसामन्य जनतेला होणार्या त्रासाशी काही पडलेले नसल्याने, कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी प्रशासना विरुद्ध साखळी उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गणपती पुर्वी रस्त्यांची कामे करण्याचे अश्वासन दिले आहे. तर गणपती पुर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची अश्वासन पूर्ती झाली नाही. तर पुढील आंदोलनाचा इशारा हा सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी सा.बां.ला दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांच्या पुढील आंदोलनाच्या इशार्यानुसार आंदोलन छेडले गेले तर होणार्या आंदोलनास कर्जत शहर बचाव समितीचा ही जाहीर पाठींबा असेल असे कर्जत शहर बचाव समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.