Varnai Mata Karjat : कर्जत तालुक्यातील पांडवकालीन वरणाई मातेला भाविकांची मोठी गर्दी

नवसाला पावणारी देवी म्हणून वरणाई माता प्रसिद्ध
Varnai Mata Karjat
कर्जत तालुक्यातील पांडवकालीन वरणाई मातेला भाविकांची मोठी गर्दीpudhari photo
Published on
Updated on

कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे, तिघर आणि नांगुर्ले या तीन गावांची ग्रामदेवता मानली जाणारी वरणाई माता सध्या भाविकांच्या श्रद्धास्थानाचे केंद्र बनली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे भक्तांची मोठी गर्दी उसळली असून उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या पाठीमागील डोंगरात प्राचीन लेण्या, तसेच दगडातून कोरलेली पाण्याची टाके आजही पाहायला मिळतात. या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी राहते. यावरून पांडवांनी भ्रमंती काळात येथे वास्तव्य केले असावे, असा समज परिसरात प्रचलित आहे.

Varnai Mata Karjat
Marigold price hike : दसर्‍याला ‘झेंडू’ भाव खाणार

वरणाई माता नवसाला पावणारी म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. श्रद्धाळू भक्त आपली इच्छा व्यक्त करून देवीसमोर गार्‍हाणे मांडतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होतात, असा विश्वास आहे. सध्या मंदिर जीर्ण झाले असून परिसरातील भक्त नवे मंदिर उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच मंदिराकडे जाणार्‍या सुसज्ज रस्त्याची उपलब्धता करणे हे भाविकांपुढे आव्हान आहे.

Varnai Mata Karjat
Tanisha Vartak | बाणांच्या अचूकतेतून प्रकटलेलं प्रेरणादायीरूप तनिषा वर्तक

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. पावसाळ्यात येथे डोंगरातून ओघळणारे धबधबे आणि वार्‍याचे झरे पर्यटकांना आकर्षित करतात, तर उन्हाळ्यातही येथे लोक दर्शनासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सध्या वरणाई मातेच्या उत्सवात परिसरातील गावकर्‍यांसह दूरदूरच्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news