

कर्जत तालुक्यातील गौरकामथ गावातील असलेल्या आदिवासी वाडीतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत वन्य पक्षी पडून मेल्याने दूषित झालेल्या पाण्यामुळे आदिवासी वाडीतील अनेकांना डायरीयाची लागण झाल्याने उलट्या जुलाब होत आहेत. बाधीत रुग्णांना उपचारा करीता कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
गौरकामत गावातील असलेल्या अंदाजे 60 ते 65 घरांची वस्ती असलेल्या आदिवासी वाडीत गौरकामत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत वन्य पक्षी कावळा पडून मेल्याने व सदर पक्षी हा कुजल्याने पाणी दुषित झाले. हे पाणी वापरणारे आदिवासी बांधवांना 27 ऑगस्ट रोजी सायंकाळ ते रात्रीचे सुमारास उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. तर उलट्या व जुलाब होऊन व्यथित झालेल्या पिडित रुग्णाला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय म्हसकर व त्यांचे टीमने सदर रूग्णांना रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. ज्या रुग्णांची तब्येत सुधारण्यात आली त्या रुग्णांना उपचार करून, रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. तर ज्या रुग्णांची तब्येत सुधारण्यात आली नाही. त्यांच्या वरती उपचार सुरू असल्याची माहिती ही कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय म्हसकर यांच्या कडून सांगण्यात आली आहे. तर सदर प्रकारणामुळे या आदिवासी वाडीतील नागरिकांना उलट्या व जुलाबाची लागण व त्यांना उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती ही 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजता गौरकामत ग्रामपंचायतीचे सरपंच आशा पवार व उपसरपंच योगेश देशमुख यांना मिळताच सदर घटनेची दखल सरपंच व उपसरपंच यांच्यासह त्यांचे सहकारी सदस्य यांनी सदर माहिती कडाव आरोग्य विभागास देताच सदर विभागाचे डॉक्टर ऋतुजा पाटील यांच्या सह त्यांची टीम ही घटनास्थळी जाऊन आदिवासी वाडीतील इतर पिडित आदिवासी रुग्णांना वैद्यकीय सेवा देत सदर पाण्याच्या टाकीतील पाण्याच्या चाचण्या घेण्यात आल्या.
आमच्या पाण्यात कावळा, बेडूक, सरडा व उंदीर असे मेल्याने घाण झाल्याने सर्व जण आजारी झाले. एकूण 15 जण असुन, त्यांना उलटी जुलाब असा त्रास होत आहे.
-वनिता सुरेश पवार, ग्रामस्थ, गौरकामत आदिवासी वाडी
गौरकामत येथील पाण्याच्या असलेल्या मुख्य स्त्रोतात मृत पक्षी आढल्याचे समजल्याप्रमाणे व त्या मृत पक्षामुळे सदर पाण्यामध्ये आळ्या पडून ते पिण्याचे पाणी हे दुषित झाले असल्याने डायरीयाची साथ आली होती. सदरच्या भागातील लोकसंख्येपैकी या घटनेमुळे बाधीत झालेले दहा रूग्ण हे संदर्भित करण्यात आले होते. त्या पैकी तीन रुग्ण हे सिरीयस होते. पण देण्यात आलेल्या उपचारामुळे त्यांची आरोग्य स्थिती ही स्थिर आहे. तर इतर रूग्ण हेही साथीपासुन बाधीत होते व त्यांचीही आरोग्य परिस्थिती स्टेबल आहे. तर बाधीत एकूण दहा रूग्ण हे ठीक आहेत. तर साथीचे बाधित रुग्ण आल्यास 25 बेड हे आमच्या कडून उपलब्ध करण्यात आले आहेत.
-विजय म्हसकर, वैद्यकीय अधीक्षक, कर्जत उपजिल्हा रुग्णालय