Karjat Torrent Project: टोरंटो प्रकल्पाविरोधात कर्जतमध्ये कडकडीत बंद

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून 'कर्जत बंद'ची दिलेली हाक
Karjat Torrent Project
Karjat Torrent ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

कर्जत: कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंटो प्रकल्पासाठी साय डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रातील झाडांची कत्तल करण्यात आली आहे यामुळे पर्यावरणाच्या हानी झाली आहे.

याचा विरोध दर्शविण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांच्याकडून सोमवारी कर्जत शहर आणि तालुका परिसर बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कर्जत शहरातील आणि नेरळ कडाव परिसरातील व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

Karjat Torrent Project
Raigad Fort Ropeway Service: रायगड रोपवे आजपासून सुरू होणार

टोरंट प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ३२ हजार ४९० झाडे तोडण्याची योजना असल्याचे सांगितले जाते. यात सुमारे २३३ हेक्टर वनक्षेत्र अन्य वापरासाठी वळवण्याचा प्रस्ताव असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. साय डोंगरासह कोथळ खलाटी, पाली आणि परिसरातील गावांमध्ये या प्रकल्पाच्या परिणामांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.