

खोपोली : खालापूर तालुक्यातील ग्रुपग्राम पंचायत कलोते मोकाशी येथे मोठे डॅम असून या माध्यमातून येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला जात आहे.मात्र या ठिकाणी पाळीव प्राणी पाळले जात असल्यामुळे त्यांचे पाळीव प्राण्यांचे मलमूत्र,विष्ठा या पाण्यात मिसळले जात असल्यामुळे हे पाणी दिवसेंदिवस दूषित होत चालले आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्ते यांच्या वरद हस्तामुळे या मालकांस भय वाटत नाही. हेच पाणी या परिसरात ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्यामुळे येथील 20 ते 25 लहान मुलांना काविळीची लागण लागल्यांचे चित्र समोर आले आहे.
यापूर्वी कलोते डॅमचे पाणी शुद्ध होते. मात्र गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी धनिकांनी येथील शेतकरी वर्गांच्या जागा घेऊन या ठिकाणी फार्म हाऊस तसेच पाळीव प्राणी पाळले आहेत. या ठिकाणी उंट, गाय, विविध जातीचे कुत्रे, घोडा, ससे, मांजर असे पाळीव प्राणी आहेत.तसेच आजारी प्राण्यावर येथे उपचार केले जातात. तसेच या पाळीव प्राण्याची मलमूत्र,विष्ठा ही कलोते धरणाच्या पाण्यात मिळसत आहे. यामुळे दिवसेंदिवस पाणी दूषित होत चालले आहे. विशेष म्हणज ग्रामपंचायत कार्यालय याच गावात असून याकडे साफ दुर्लक्ष्य केले जात आहे. याच बरोबर हाकेच्या अंतरावर खालापूर, चौक ग्रामीण रुग्णालय आहे.मात्र आरोग्य खाते बेसावध असल्यांचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. या परिसरातील स्थानिक कार्यकर्ते यांचा पाठबळ असल्यामुळे कुणालाही न जुमानता राजरोसपणे येथे पाळीव प्राण्यांचा व्यवसाय सुरु आहे.या संदर्भात येथिल ग्रामस्थ अक्रमक झाले असून शासकीय पातळीवर निवेदन देण्यात आले आहे.
मयुर किरण पाटील,रिषभ ठोंबरे,वरद ठोंबरे,जानवी ठोंबरे,मधीरा सावंत, मनिष सावंत, स्वरा ठोंबरे,भुषण ठोंबरे अशी अनेक मुले कावीळ बाधित आहे.तसेच काहीची नावे समजली नाही.मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राने मुलांची तपासणी करावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कलोते मोकाशी परिसरात तीन दिवसापासून आरोग्य विभागाच्या माध्यमातून तीन टीम तयार करून रुग्णांची तपासणी करीत आहेत. त्यामुळे काही रुग्ण उपचारा नंतर बरे ही झाले आहेत. अधिक तपासणी सुरू असून पाण्याचे नमुने ही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
-डॉ. प्रसाद रोखडे, आरोग्य अधिकारी खालापूर