Kalamboli garden: कोट्यवधींचा चुराडा, तरीही कळंबोलीचे उद्यान उजाडच

सर्वत्र धुरळाच धुरळा, हिरवळही करपली, रात्रीही बसतात गरम चटके
Kalamboli garden
Kalamboli gardenPudhari
Published on
Updated on

दीपक घोसाळकर

कळंबोली: कळंबोली वसाहती मधील सेक्टर 4 मधील उद्यानात झाडांना आणि हिरवाळीला पाणी न मिळाल्याने उन्हाच्या कडाक्याने हिरवळ करपून गेली आहे कोट्यावधी रुपये खर्च करूनही उद्यानात सायंकाळी धुरळा उडत आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी पैसे खर्च करायला पाहिजे तिथे खर्च न करता सीसीटीव्ही साठी पैसे खर्च केले गेल.

परंतु उद्यान हिरवगार हवं यासाठी महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे . झाडांना पाणीच न मारल्याने झाडेही करपू लागली आहेत बसण्यासाठी करण्यात आलेल्या कठडे प्रचंड तापल्याने रात्री आठ वाजता ही त्याच्यावर उद्यानात येणारे नागरिक बसू शकत नाही एवढेच चटके नागरिकांना बसत आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका उद्यानाबरोबरच रहिवाशांनाही बसत आहे.

Kalamboli garden
Raigad tourism: अखेरच्या टप्प्यात पर्यटकांची गर्दी; समुद्र किनाऱ्यांवर हजारो पर्यटक

कळंबोली वसाहती मधील सेक्टर 4 मधील एक उद्यान महापालिकेकडून विकसित करण्यात आलं. या ठिकाणी उद्यान ऐवजी छोटे छोटे कार्यक्रम करण्यासाठी एक थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे.

यासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे. या उद्यानाची निर्मिती करण्यापूर्वी सिडकोने सुद्धा उद्यानावर लाखो रुपयाची उधळपट्टी केलेली आहे. नागरिकांना फक्त हिरवगार सुशोभित बहारदार झाडांनी भरलेलं उद्यान हवं होतं. परंतु या ठिकाणी उद्यानाचे पूर्णतः काँक्रिटीकरण केल्याने उद्यानाची व्याख्या पूर्णपणे बदलली गेली आहे. सद्यस्थितीत सदरचे उद्यान महापालिकेकडून दुर्लक्षित होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

या उद्यानामधील हिरवळ केव्हाच करपून गेली आहे. पाणी मारलं नसल्याने काही झाडे सुकूनही गेली आहेत. उद्यानाच्या गेटवरच येथील विजेची वाहिनी रस्त्यावरच उघडी आहे. पाण्याअभावी उद्यानामधील असणारी हिरवळ ही कायमची नाहीशी झालेली आहे.झाडांना तसेच मार्बलचे बसण्यासाठी केलेले कठडे याच्यावर सायंकाळी पाणी न मारल्यामुळे उन्हाच्या तीव्र उष्णतेने तापलेले मार्बलच्या कठड्यावर नागरिकांना रात्री आठ वाजता ही बसता येत नाही, एवढेच चटके त्यांना बसत आहेत. ज्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी उद्यानात खर्च करायला हवा आहे त्याकडे उद्यान विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे.

Kalamboli garden
Stormy Weather Fishing Impact: रायगडमध्ये पावसाळी बंदीमुळे मच्छीमारी बोटी किनारी ओढण्यास सुरूवात; 1 जूनपासून मासेमारी बंद

हिरवगार आणि बहारदार झाडांची येथे आवश्यकता असताना नको त्याच अनावश्यक गोष्टींवर महापालिका खर्च करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत उद्यानात येणारे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. उद्यान हिरवगार हवे असताना पाण्याअभावी करपलेल्या हिरवळीमुळे येथे कोट्यावधी रुपये खर्च करूनही मातीच्या धुरळाच उडत असल्याचे दिसत आहे.

उद्यानामध्ये असलेली सुविधा दूर करण्याबाबत संबंधित प्रशासनाला व अधिकाऱ्यांना सक्षम भेटून झाडांना पाणी मारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी पुन्हा त्यांची भेट घेऊन उद्यानांमधील हिरवळीला पुन्हा संजीवनी मिळण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी लेखी पत्र व्यवहार केला जाणार आहे.

- बायजाबाई बारगजे,नगरसेविका कळंबोली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news