

कळंबोली ः कळंबोली वसाहती मध्ये शनिवारी सकाळी प्रचंड प्रमाणात गढूळ मिश्चित दूषित पाणीपुरवठा झाल्याने वसाहती मधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे .मात्र संताप नेमका कोणाबाबत व्यक्त करावा हेच नागरिकांना उमजले नाही. मालमत्ता कर महापालिकेला भरतोय तर सिडको विरुद्ध बोंब मारून उपयोग काय असा उपरोधिक सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत. सिडको कडून माती मीश्चित पाणी आल्याने सोसायटी तील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये खर्चाचा भुर्दंड लागत असल्याचे गुरुविला सोसायटीचे अध्यक्ष जगदीश पाटील यांनी सांगितले आहे.
पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येऊन दहा वर्षाचा कालावधी लोटला आहे .तब्बल दहा वर्षाचा मालमत्ता कर एकाच वेळी भरण्याचा तागादा लावणार्या महापालिकेला अद्यापही स्वच्छ निर्मळ आणि भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा करणे जमत नाही. अद्यापही पाणीपुरवठा सिडको कडून करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी कळंबोली वसाहती मधील बहुतांशी सोसायटी मधून गाळ मिश्रित गढूळ पाणी आल्याने वसाहतीमधील हाऊसिंग सोसायटी धारकांनी संताप व्यक्त केला आहे . गाळ मिश्रित गढूळ आलेले पाणीच आता वसाहती मधील नागरिकांना प्यावे लागणार आहे.
वसाहती मधील नागरिक विविध आजारांनी वेढले गेले आहेत .त्यात सिडको कडून गाळ मिश्चित पाण्याची भर पडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गाळ मिश्रित पाणी आल्याने सोसाट्यातील असलेली पाण्याची टाकी साफ करण्यासाठी पाच ते सहा हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.
सिडकोतर्फेच पाणीपुरवठा
कळंबोली येथील पाणीपुरवठा अद्यापही सिडकोकडे आहे .सिडको पाणीपुरवठा करताना पाण्यावर योग्य ती प्रक्रिया जंतुनाशक किंवा गाळ काढण्याचे काम करते की नाही असे आता नागरिक विचारत आहेत .शनिवारी सकाळी झालेल्या पाणी मिश्रित गढूळ पाण्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. गढूळ पाणी आल्याने तेच पाणी टाक्यात साठवले आहे. टाक्यांमधून पाणी मोटर पंप ने इमारतीमध्ये चढवले जाते. अन् तेच गाळ मिश्रित पाणी नागरिकांना प्यावे लागते.