

पोलादपूर : या वर्षीच्या हंगामात पावसाने दमदार हजेरी लावत जुलै महिन्याच्या सुरवातीपासून शेवटच्या टप्यात जोरदार पर्जन्यवृष्टी करत 2 हजार 43 मी मी ची सरासरी गाठत वार्षिक सरासरीच्या 58 टक्के पाऊस पडल्याने तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे भय चालू वर्षी सुद्धा जाणवत असले तरी सुदैवाने जीवित हानी टळली आहे.
24 जुलै पर्यंत तालुक्यातील पावसाची सरासरी 2043 मी मी असल्याचे आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यलय मधून सांगण्यात आले मात्र आजच्या दिवसापर्यंत 2024 मध्ये 2 हजार 168 मी मी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मे महिन्याच्या 9 पासून अवकाळी तर मे महिन्याच्या शेवटच्या टप्यात मुसळधार पावसाने पाचशे चा टप्पा गाठला होता गतवर्षी पेक्षा या वर्षी 125 मिं.मी.ने पाऊस कमी झाला असला तरी येणार्या काही दिवसात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे चर्चिले जात आहे.
पोलादपूर तालुक्यातील वाकन, कोंढवी, पोलादपूर या तीन ठिकाणी पडणार पाऊस व डोंगरे भाग व घाट माथ्यावर कोसळणार्या सरी लक्षात घेता तालुक्यातील सरासरीच्या 58 टक्के पाऊस जुलै महिन्याच्या 24 पर्यंत झाला आहे या वर्षी वेधशाळा ने नोंदविले निर्देश लक्षात घेता या वर्षी तालुक्यात सरासरी पेक्षा 20 ते 25 टक्के पाऊस जास्त पडण्याची शक्यता वाढीस लागली आहे तालुक्यातील आपत्ती चे भय कायम राहिले असून मुसळधार पावसात दरड सह झाडे पडण्याच्या घटना कायम राहिल्या आहेत.
जुलै महिन्यात तालुक्यातील आंबेनली घाट आह जुना कशेडी घाट सह कशेडी बोगदा च्या मार्गवर, पलचिल मार्गवर, कुडपण मार्गवर दरड कोसल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दरडीचे सातत्य लक्षात घेता 15 ऑगस्ट 2025 पर्यत पोलादपूर महाबळेश्वर मार्गवरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे तर हलकी वाहने फक्त दिवसा सुरू आहेत मात्र रेड व ऑरेंज अलर्ट च्या काळात पूर्ण वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याने या मार्गवर फक्त हलकी वाहने दिसून येत आहे.
पावसाळी हंगामात मे महिन्यात पासून या मार्गावर लहान मोठी झाड पडण्याच्या घटनेला सुरवात झाली आणि जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसल्याने भय इथले संपत नसल्याचे अधोरेखित होत आहे. पोलादपूर महाबळेश्वर या आंबेनळी घाटात मौजे कापडे खुर्द या गावाजवळ 24 रोजी दुपारी 12.30 वाजता दरड कोसळली होती या पूर्वी सुद्धा या ठिकाणी मातीचा ओसरा खाली आला होता. तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती नंतर पोलादपूर तालुक्यातील यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहचत रस्ता मोकळा करण्यात येत होता.
पोलादपूर तालुका प्रशासन अलर्ट मोडवर असून दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्ती निवारणामार्फत सर्वत्र दक्षता घेतली जात आहे अतिवृष्टी दरम्यान कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून या कामी तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाट, सपोनि आंनद रावडे व आपत्ती निवारण कक्ष, पोलादपूर तालुक्यातील रेस्क्यू टीम सदस्य दक्ष असल्याचे दिसून आले आहे.