DRI seizes Pakistan goods: जेएनपीएमध्ये 28 कंटेनर जप्त

12 कोटींचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने,खजूर आढळला ; 2 जणांना अटक
DRI seizes Pakistan goods
जेएनपीएमध्ये 28 कंटेनर जप्तpudhari photo
Published on
Updated on

उरण: राजकुमार भगत

जेएनपीए (न्हावा शेवा) बंदरात महसूल गुप्तचर संचालनालयाने 12 कोटी रुपये किमतीचे पाकिस्तान-निर्मित 28 कंटेनर जप्त केले आहेत. या कंटेनर्समध्ये 800 मेट्रिक टन सुके खजूर आणि सौंदर्यप्रसाधने होती. या प्रकरणी दुबईस्थित पुरवठादार आणि एका कस्टम ब्रोकरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 2 मे 2025 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून येणार्‍या वस्तूंवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आयातबंदी घातली होती. या निर्णयानंतर जुलैमध्ये ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट सुरू करण्यात आले. या ऑपरेशनचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. आयातबंदी टाळण्यासाठी अनेक सिंडिकेट्स बनावट मूळ-देश प्रमाणपत्रे आणि चुकीच्या शिपिंग कागदपत्रांचा वापर करत असल्याचे या तपासणीत आढळले आहे.

डीआरआयच्या तपासानुसार, जप्त करण्यात आलेले हे सौंदर्यप्रसाधने आणि खजूर जेबेल अली पोर्ट, दुबईमार्गे भारतात आणले गेले होते.मुळात ही उत्पादने पाकिस्तानची असूनही, ती यूएई-निर्मित असल्याचे खोटे घोषित करून आयातबंदी टाळण्याचा प्रयत्न केला गेला. तपासणीत या वस्तूंचा उगम पाकिस्तानमधूनच झाल्याचे निश्चित झाले आहे.

सौंदर्यप्रसाधनांच्या प्रकरणात एका कस्टम ब्रोकरला अटक करण्यात आली असून, त्याने मूळ देशाची चुकीची माहिती देऊन या व्यवहारात मदत केली, असे अधिकार्‍यांनी सांगितले. यापूर्वीही डीआरडीएने अशाच प्रकारे कारवाई करत अनेक बेकायदेशीर माल हस्तगत केलेला आहे. यामध्ये कोट्यवधींचा परकीय माल जप्त करुन जेएनपीएमधील सुरक्षा आणखी कडक करण्यात आलेली आहे.आताही त्याच धर्तीवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

DRI seizes Pakistan goods
Raigad News: खाडाखोड करुन कुणबी समाजाच्या नोंदी

या कारवाईमुळे व्यापार मार्गांचा गैरवापर थांबवून देशाची राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या धोरणांचे पालन करण्याची डीआरआयची बांधिलकी दिसून येते.

दुबईस्थित भारतीय पुरवठादाराचा सहभाग

सुक्या खजुरांच्या प्रकरणात, दुबईस्थित एका भारतीय पुरवठादाराने बनावट बिले तयार करून या मालाच्या वाहतुकीत मदत केल्याचे आढळले आहे. या पुरवठादाराने कमिशनवर काम केले असून, भारत आणि पाकिस्तानमधील वस्तूंच्या आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा लपवण्यासाठी त्याने स्वतःच्या कंपन्यांचा वापर केला, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news