

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
मुरुड हे पर्यटनाचे क्षेत्र असल्याने नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी आज शेकडोंच्या संख्येने विविध जिल्हयातुन पर्यटक मुरुड राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी तुफानी गर्दी केली आहे. नुकतेच गेट वे ऑफ इंडियाला झालेल्या बोट अपघातामुळे जंजिरा किल्ल्यात जाताना सुरक्षा जॅकेट सक्तीचे करायणात आहे आहे.
गेटवे ते एलिफंटा या ठिकाणी जाताना पर्यटकांच्या बोटीला नेव्ही च्या बोटीने जोरदार धडक दिल्याने बोट फुटुन या मध्ये लहान मुलांसह 13 जणांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मूत्यु झाल्याने पॅसेंजर बोटीत संख्ये पेक्षा जास्त प्रवासी घेऊन नये तसेच प्रत्येक पॅसेंजरला सेफ्टी जॅकेट घातल्याशिवाय प्रवास करु देऊ नये असा आदेश शासनाकडून काढल्याने राजपुरी येथील बंदर निरीक्षक सतिष देशमुख यांनी या आदेशाचा पालन करत राजपुरी जेट्टीवरुन आज प्रत्येक बोटीत संख्यानुसार ते पण प्रत्येक पर्यटकांना सेफ्टी जॅकेट घालून बोटीत प्रवेश दिला जात होता. ज्या बोटीत लहान मुलांना सेफ्टी जॅकेट नसतील त्या बोटींना परवानगी नाकारल्याने तिकीट कार्यालया जवळ गोंधळ उडाला आणि पर्यटकांनी नाराजी दर्शवली.
काही पर्यटकांनी बंदर निरीक्षक यांना घेराव घालून लहान मुलांना सोडण्यास विनंती केली आमच्या जबाबदारी वरघेऊन जातो. परंतु बंदर निरीक्षक यांनी साफ नकार दिल्याने बंदर निरीक्षक यांना पर्यटकांच्या रागाला सामोरे जावे लागले. यावेळी मुरुड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी जेट्टीवर येऊन किल्लाचे फोटो काढून परतावे लागले.
आज मुंबई , पुणा, सातारा, पनवेल, नाशिक, वाई आदिंसह राज्यातुन पर्यटकांनी आप आपल्या गाड्या घेऊन सकाळच्या दरम्यान किल्ला पाहण्यासाठी आले असता. बोटीत लहान मुलांना नो एन्ट्री केल्याने पर्यटकांनी नाराजी दर्शवली.