

पेण : पुढारी वृत्तसेवा
तीव्र उन्ह आणि पाऊस अशा बदलामुळे पेण तालुक्यात वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मलेरिया, ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पेण तालुक्यात अजूनही दररोज पाउस पडत असून दररोज कडक उन्ह आणि संध्याकाळी जोराचा पाऊस असे चित्र गेले आठवडाभर सुरु आहे. (Malaria Patients)
या बदलत्या हवामानानुसार व घराशेजारील गटारामध्ये साचलेले पाणी, घराच्या छतावर टायर, हौद प्लॅस्टिक डब्यांमध्ये साचून राहिलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती होत असून हे डास चावल्यामुळे डेंग्यूसदृष्य आजाराचाही फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे.
याशिवाय दमट वातावरण अन्य अपुऱ्या सुर्यप्रकाश यामुळे विविध आजारांची लागण लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिसून येत आहे. त्याचबरोबर बदलत्या हवामानामुळे ऑक्टोबर हिट जोरात वाढू लागल्याने भातशेतीच्या कापणीमध्ये शेतकरी शेतात साठलेले गरम पाणी पिऊन तहान भागवत आहेत. यामुळे नागरिकांना ताप खोकला सारखे आजार वाढू लागले आहेत. शिवाय तालुक्यात मलेरिया आजाराचे अनेक रुग्ण दिसून येत आहे.
हवामान बदलावामुळे तसेच वाढत्या डांसाच्या उत्पत्तीमुळे रक्तातील पेशी कमी होण्याचे प्रकार व मलेरिया सारखे आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत. त्याचबरोबर तापाची साथही मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्दी, खोकला व घशाच्या संसर्गान डोके वर काढले आहे.
सर्दी, खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी, याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. ही एखादया गंभीर आजाराची चाहूल असून शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून पेण तालुक्यात वातावरण पोषक राहिल्याने तापसराईचे प्रमाणही वाढले आहे.
पावसाची उघड - झाप यामुळे शरी- रावर त्याचा प्रभाव पडत असतो. लहान मुलांवर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. तालुक्यात सध्या व्हायरल तापाचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
त्याचबरोबर साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमधून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने किटकजन्य आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत. अशा रुग्णाची वाढ होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून अशा कोणत्या तापसराईचे रुग्ण आहेत, त्याची तपासणी करून योग्य तो औषधांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
पाण्याच्या डबक्यांमधून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने किटकजन्य आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत. अशा रुग्णाची वाढ होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून अशा कोणत्या तापसराईचे रुग्ण आहेत त्याची तपासणी करून योग्य तो औषधांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.