

complaint behavior Teacher Zilla Parishad schools transferred
अलिबाग : सुवर्णा दिवेकर
शाळेतील लैंगिक अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता शिक्षकांची तक्रार आल्यास 30 दिवसांच्या आत चौकशी करून बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवावा लागणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हयांतर्गत बदल्यांच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. जिल्हा परिषदेच्या गुरुजींच्या गैरवर्तणुकीबद्दल तक्रार झाल्यास बदली होणार असल्याने चिंता वाढली आहे. मात्र, तक्रारीचे स्वरूप स्पष्ट नसल्याने बदली प्रक्रियेचा दुरुपयोग होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास जिल्ह्य परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेतील. संबंधित शिक्षकाला त्या पदावर ठेवणे योग्य नाही, असे मत झाल्यास कारणमीमांसा नमूद करून विभागीय आयुक्तांकडे शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील.