मी खचणार नाही, मी लढणार आहे : स्नेहल जगताप

Mahad Assembly | ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा निर्धार
I will not give up, I will fight: Snehal Jagtap
मुंबई : महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना जगताप
Published on
Updated on

महाड | महाड विधानसभा मतदार संघात आपण जोपर्यंत विजयश्री खेचून आणत नाही, तोपर्यंत ही सुरू असलेली लढाई संपलेली नसून, कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये,असे भावनिक पण प्रेरणादायी आवाहन ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी केले आहे.

स्नेहल जगताप यांनी काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला पश्चात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणुकीतील झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये व आजपासूनच पाच वर्षानंतर येणार्‍या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे आवाहन केले.

विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहल जगताप यांचा झालेला पराभव हा कार्यकर्त्यांना धक्कादायक ठरल्याचे महाडमध्ये सर्वत्र दिसून येत होते सायंकाळी उशिरा शेकडो समर्थकांनी कॅप्टन निवास येथे जाऊन नानासाहेब जगताप व स्नेहल जगताप यांची भेट घेतली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना व सहकारी पदाधिकार्‍यां समोर स्नेहल जगताप यांनी या निवडणुकीदरम्यान दोन महिन्यापासून महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद दिले आपली लढाई ही सोपी नव्हती हे माहीत असूनही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी या लढाईमध्ये तन, मन, धन हरपून सर्वस्व दिल्या कारणानेच आपण 91 हजार मतांपर्यंत पोहोचू शकलो असे स्पष्ट केले. पराभवाची कारण मीमांसा करून पुढील विजयासाठी सर्वांनी सिद्ध होण्याचे आवाहन केले. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत कार्यकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले मात्र तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी एकजुटीने दिलेला लढा हा पुढील काळासाठी सर्वांना ताकद व प्रेरणादेणारा ठरलेला असा विश्वासही व्यक्त करून कार्यकर्त्यांनी या पराजयामुळे खचून जाऊ नये, असे मत व्यक्त केले. हे आवाहन करताना त्या भावूक झाल्या होत्या. पण लगेच स्वताला सावरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news