

नागोठणे ः शामकांत नेरपगार
प्रेमात अडसळ ठरत असलेल्या नवऱ्याचा प्रियकराच्या मदतीने खून करुन फरार झालेल्या आरोपींना नागोठणे पोलिसांनी 72 तासात जेरबंद करुन खुनाचा उलगडा केला आहे. कृष्णा नामदेव खंडवी (23 रा. गौळावाडी पो. पाबळ ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णाची पत्नी दिपाली अशोक निरगुडे,तिचा प्रियकर प्रियकर उमेश सदु महाकाळ वय 21 वर्ष रा. बारीमाळ पो. ओझरखेड ता. त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक व प्रियंकराची मैत्रीण सुप्रिया प्रकाश चौधरी यांना नागोठणे पोलिसांनी जेरबंद केले आहे.
नामदेव निरगुडे यांनी आपला मुलागा कृष्णा नामदेव निरगुडे हा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी नागोठणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज संकलित करून त्याची पाहणी करून त्या आधारे अधिक तपास केला. तसेच मिसींग व्यक्तीच्या मोबाईल नंबरचा सीडीआर प्राप्त करून त्याचे तांत्रीक विलेषणकरून त्यामधून संशयित नंबर प्राप्त करून त्यांचा सीडीआर / एसडीआर प्राप्त करण्यात आला. केलेल्या तपासाच्या आधारे पोलीस पथक तयार करून नाशिक तसेच रायगड परिसरामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुशंगाने सखोल तपास करण्यात आला.
कृष्णाची पत्नी दिपाली अशोक निरगुडे ही माणगाव येथे दोन वर्षापासून नर्सिंगचा कोर्स करीत असल्यामुळे ती तिच्या पतीपासून वेगळी माणगाव येथे राहत होती. त्याच दरम्यान उमेश सदू महाकाळ याच्यासोबत तिची ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि दोघांचे दोन वर्षापासून एकमेकांवर प्रेम होते. त्यांना लग्न करण्याचे असल्याने त्या दोघांनी व सुप्रिया प्रकाश चौधरी यांनी कट कारस्थान रचून इन्स्टाग्रामवर एक खोटे पायल वारगुडे नावाचे अकाउंट सुरु केले. त्यात कृष्णा याच्याशी सुप्रिया चौधरी हिने व्हाईसकॉल करून प्रेमाचे खोटे संबध जुळविले. तसेच आपल्यावर दोष येवु नये म्हणून वेगवेगळया व्यक्तींच्या स्कॅनरवरती तीनवेळा 2 हजार,80 रू व 60 रू असे कृष्णाकडून स्वीकारले.
उमेश महाकाळ व सुप्रिया चौधरी 10 ऑक्टोबरला हे मोटारसायकलवर आले. उमेश महाकाल याने तोंडाला रूमाल व सुप्रियाने स्कार्प बांधून नागोठणे एस.टी. स्टॅन्डवर बोलावून घेऊन त्यास मोटारसायकलवर उमेश महाकाळ व सुप्रिया चौधरी यांनी मध्ये बसवुन त्यास प्रेमाच्या खोट्या जाळ्यात फसवुन अपहरण केले. त्याला नागोठणे जवळील वासगाव येथील जंगल भागात घेऊन गेले. तेथे गेल्यावर उमेश महाकाळने कृष्णाला पाठीमागुन धरले व सुप्रिया चौधरी हिने ओढणीने मरेपर्यंत कृष्णाचा गळा आवळुन खाली पाठीवर व डोक्यावर आपटून खून केला. पोलिसांनी याबाबतचा कसून शोध घेत आरोपींना जेरबंद केले. कृष्णा खंडवी याला आरोपी दिपाली अशोक निरगुडे हिच्या पासून झालेली दोन वर्षाची मुलगी आहे.
ठार मारुनही लेसने गळा आवळला
कृष्णा मेल्याची खात्री करण्याकरता पुन्हा कृष्णाच्या बुटाची लेस काढून ती मानेभोवती आवळुन मानेला बांधुन ठेवली व कृष्णा मयत झाल्याची खात्री करुन घेतली.तसेच त्याची ओळख पटु नये म्हणून चेहरा,हात,छातीवर केमिकल टाकून चेहरा विद्रूप केले. खिशातुन त्याचा मोबाईल काढून घेऊन बाहेर येऊन आणलेल्या मोटारसायकल वरून दोघे निघून जाऊन पाली गावाच्या हद्दीत मयत कृष्णा खंडवी याचा मोबाईल मधील सिम काढून मोबाईल बंद करून फोडून टाकला.