Street lights off due to unpaid bill : वीज बिल न भरल्याने महामार्ग अंधारात

रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गावरल समस्या संपता संपेनात,वाहनचालकांना होतोय त्रास
Street lights off due to unpaid bill
वीज बिल न भरल्याने महामार्ग अंधारातpudhari photo
Published on
Updated on
पेण : स्वप्नील पाटील

कोकणातील एकमेव असणार्‍या मुंबई- गोवा महामार्गावरील पूलांवर उभारण्यात आलेले पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने महामार्गावरून जाणार्‍या वाहनधारकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे उभारण्यात आलेले पथदिवे तात्काळ विद्युत रोषणाईने झगमगून निघावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

पनवेल पळस्पे फाटा येथून सुरू झालेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पेण ते वडखळ पर्यंत बर्‍यापैकी पुर्ण झाला असला तरी या दरम्यान ठिक ठिकाणी पुलांवर विद्युत पोलांची उभारणी करून महामार्गावर पथदिवे लावण्यात आले आहेत त्यामुळे महामार्ग रात्रीच्या सुमारास पथदिव्याने उजळून निघाल्याने मुंबई- गोवा महामार्गावरून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग या ठिकाणी जाणा-या हजारों पर्यटकांना रात्रीच्या वेळी उजेडाचा फायदा होऊन अपघातांना आळा बसत होता.परंतु काही दिवसांपासून हेच पथदिवे पेण हद्दीतील पूलांवरील बंद असल्याने नागरीकांसह येथून जाणार्‍या वाहनधारकांना त्याचा फटका बसत असून यामुळे अपघाताचे प्रमाण पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

नुकतीच जानेवारी महिन्यात म्हणजेच ईंग्रजी नववर्षाच्या मुहूर्तावर हे पथदिवे प्रकाशझोतात आणले गेले होते.मात्र अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच पथदिव्यांची रोषणाई गेल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे सुरू उमटत आहेत.त्यामुळे सदरचे पथदिवे तात्काळ सुरू करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी केली आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरील पनवेल पासून पुढे पेण वडखळ पर्यंतच्या पूलावर विद्युतपोल उभारणी करून त्यावर पथदिवे बसवून ते सुरू करण्यात आल्याने रात्रीच्या सुमारास महामार्गावर लखलखीत उजेडामुळे वाहनधारकांचा प्रवास योग्य होत होता.परंतु राष्ट्रीय महामार्गावरून सदर पथदिव्यांच्या रोषणाईचा बिलविद्युत मंडळाला अदा न केल्यामुळे काही दिवसांपासून पथदिवे बंद पडले आहेत.त्यामुळे संबंधित खात्याने तात्काळ बिल भरावे म्हणजे पूलांवरील पथदिवे सुरू राहतील.

विश्वास म्हात्रे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर जे.एम.इन्फ्रास्ट्रक्चर

महामार्गावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांचा बील संबंधित खात्याने मार्च महिन्यापासून साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपयांच्या आसपास न भरल्यामुळे पथदिव्यांची लाईट कट करण्यात आली आहे. सदर लाईट बिल भरून प्रवाशांना रात्रीच्या वेळी सुखकर प्रवास करण्यास सहकार्य करावे.

आशिष मेश्राम उप कार्यकारी अभियंता पेण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news