

खारघर : शेतावर असलेले गुप्तधन बाहेर काढून पूजाविधी करून कुटुंबाचा होणारा त्रास कमी करून देतो त्यासाठी पूजेकरता 39 लाख 70 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तोसीफ मुजावर, मेहताब मुजावर, अझर मुजावर यांच्या विरोधात 26 जुलै रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाजे येथील 41 वर्षीय ईमाची हाती घेतलेली कामे अपूर्ण राहत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान व मानसिक त्रास होत होता. यावेळी त्यांना पनवेल रेल्वे स्टेशन समोरील ज्योतिषाकडे मित्र घेऊन गेला. ज्योतिषाने मांत्रिक तोसिफ मुजावर व सोबत दोन लोकांना घेऊन त्यांच्या कार्यालयात आले. यावेळी त्यांनी शेतावरून घरी अडचण येत आहेत घरातील लोकांवर करणी केली आहे असे सांगून शेती दाखवण्यास सांगितले. त्यांनी शेती पाहून शेतात गुप्तधन असून गुप्तधनावर पीर बाबाची शक्ती आहे असे सांगितले.
सर्व विधी पूर्ण झाले असून अंगात आल्यावर मी परवानगी दिल्याशिवाय काहीही उघडून पाहू नका नाहीतर गुप्तधनाची व सोन्याची माती होईल असे सांगून तो निघून गेला. एक महिन्यापासून येतो असे बोलून निघून गेलेला मांत्रिक परत न आल्याने शंका आली. त्यामुळे त्यांनी बहिणीच्या घरी जाऊन कपड्यात बांधलेले गाठोडे सोडून पाहिले असता त्यात माती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पूजाविधी करावी लागणार असे खोटे सांगून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. 34 तोळे सोने आणि पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे गुप्तधन बाहेर काढण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून विधीचा किरकोळ खर्च होईल त्यानंतर कुटुंबाचा त्रास कमी होईल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पूजा केली त्यानंतर वाजेच्या फार्म हाऊसवर चार दिवस विधी केला आणि त्यानंतर करंजाडे येथील दुसर्या शेतावर पूजावधीसाठी खर्च सांगून खड्डा खोदण्यास सांगितले. पुन्हा वाजे येथील फार्म हाऊसवर पूजा केली. पूजा झाल्यावर सोन्याचा ताविज, सोन्याची चैन देण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा तोसीफ याने शेवटचा विधी करावा लागेल असे सांगितले आणि घरातील सोने व काही रक्कम याची मागणी केली. यावेळी त्यांना गंठण व रोख रक्कम देण्यात आली. त्यानंतर त्यांना कपड्यात काहीतरी बांधून दिले.