Matheran tourism : पर्यटकांना खुणावतेय संततधारेसह बोचरी हवा

माथेरानला पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी,मिनीट्रेन बंदमुळे प्रवाशांचीही गैरसोय
Matheran tourism
Matheran tourismpudhari photo
Published on
Updated on

माथेरान :मागील तीन दिवसांपासून माथेरान येथे सातत्याने सुरू असलेल्या पावसाने अजूनही उसंत घेतली नसून मागील दोन दिवस वीजही गायब झाल्याने येथील जनजीवन बाधित झाले आहे.मात्र,या थंडगार वातावरणातही माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.माथेरानला येण्यासाठी ई रिक्षांसाठी मोठी गर्दी होत आहे.

मागील काही दिवसांपासून येथे जोरदार पाऊस पडत असून मागील दोन दिवसांपासून तर पाऊस व वाऱ्याने थैमान घातल्याने माथेरान मधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनेक ठिकाणी वीज गायब झाली आहे तर झाडे पडण्याचे प्रमाण ही वाढले असून ठीक ठिकाणे झाडाच्या फांद्या व झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.

Matheran tourism
​Roha civic dispute : रोहा पालिका प्रशासन विरुद्ध नगरसेवक संघर्ष

माथेरान मध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने आज माथेरान करांना पाण्याचे पाणी पुरवठा झाला नाही चोवीस तासाहून अधिक काळ वीज नसल्याने इंटरनेट सेवा बंद पडली होती तर व्यवसायांना ऑनलाईन पेमेंट बंद झाल्याने मोठा फटका सहन करावा लागला मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने अनेक पर्यटकांना ही आपल्या कुटुंब सोबत संपर्क करणे जड जात होते.

Matheran tourism
Vasai library slab collapse : महापालिका वाचनालयाचा स्लॅब कोसळला

पावसाळी पर्यटनाला प्रतिसाद

या पावसात पर्यटक मात्र वर्षा सहलीचा आनंद घेताना दिसून येत होते,माथेरान मिनी ट्रेन शटल सेवेस पर्यटकांची मोठी पसंती दिसून येत असून या गाडीतून प्रवास करण्यासाठी पर्यटकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत तर पर्यटकांची संख्या वाढल्याने स्वस्तातील पर्याय म्हणून ई रिक्षा साठीही पर्यटक रांगा लावून प्रवास करीत आहेत, यावेळेस हौशी पर्यटक पावसाळ्यात अश्व रपेटींचा आनंद घेताना ही दिसत असून माथेरान चे वर्षा पर्यटन आता खऱ्या अर्थाने बहरले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news