Fort Raigad Closed| मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ८ व ९ जुलैरोजी किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद

प्रांताधिकारी पोपटराव ओमासे यांचे आदेश
Raigad Fort stairway closed
किल्ले रायगडावरील पायरी मार्ग बॅरीकेट लावून बंद करताना पोलीस(Pudhari Photo)
Published on
Updated on

Raigad Fort Steps Route Closed

इलियास ढोकले

नाते : हवामान विभागाने महाड तालुक्यासह परिसरासाठी पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून ८ आणि ९ जुलै रोजी किल्ले रायगडावर जाणारे नाणे दरवाजा व चित्त दरवाजा हे दोन्ही पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी पोपटराव ओमासे यांनी जारी केले आहेत.

मुसळधार पावसामुळे किल्ला परिसरात दरड कोसळणे, माती घसरणे आणि अन्य नैसर्गिक धोके निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात दरवर्षी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर भेट देत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

Raigad Fort stairway closed
Raigad heavy rainfall : रायगडमधील तीन हजार घरांना अतिवृष्टीचा फटका

या संदर्भातील सूचना व इशारे स्थानिक प्रशासनामार्फत किल्ल्याच्या पायथ्याशी तसेच संबंधित ठिकाणी फलकांद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तसेच ८ व ९ जुलै या कालावधीत शिवभक्तांनी पायरी मार्गाने किल्ले रायगडावर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news