Khopoli Rain : खोपोलीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

डीपी रस्ता गेला वाहून, गटारे नालेसफाईवर प्रश्नचिन्ह ?
Khopoli Weather Update
खोपोलीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरीpudhari photo
Published on
Updated on

खोपोली ः खोपोलीत पावसाची दमदार हजेरी लागली असून, वाढत्या उष्णतेने आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.शुक्रवारी दुपारनंतर ढगाळ वातावरणानंतर खोपोली खालापूर तालुक्यात परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

शहरात पावसाळ्यात नाले-गटारे तुंबून पूरस्थिती निर्माण होवू नये याकरिता खोपोली पालिका आरोग्य व बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध प्रभागातील लहान-मोठी गटारे नाले,सफाईचे काम दरवर्षी हाती घेतले जाते. यंदाही शहरातील नालेसफाई सुरू केली आहेत ती कुठे सुरू आहे सवाल खोपोलीकरांना पडला आहे.

Khopoli Weather Update
Unseasonal Rain Sindhudurg | दोडामार्ग, वैभववाडीत अवकाळी जोर 'धार'!

मान्सूनपूर्व पावसाने खोपोलीसह खालापूर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी भंबेरी उडालेल्या नागरिकांनी मिळेल त्या छपराचा आसरा घेतला असून सुमारे एक तास सलग पडलेल्या या पावसामुळे बाजारहाट किंवा अन्य कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच फजिती झाली.

Khopoli Weather Update
Pune Monsoon Preparation: पुण्यात नालेसफाई आणि अतिक्रमण हटविण्याची मोहीम; पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज

अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात केल्याने वीटभट्टी व्यवसाय धोक्यात आल्याने वीटभट्टी व्यवसायिक चिंतेत सापडले आहेत. तर अवकाळी पाऊस पडल्याने उकाड्यापासून खालापूर - खोपोलीकरांना दिलासा दिला असला तरी अनेकांचे मोठे नुकसान झाले असून लग्नकार्यात पावसाचे विघ्न येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news