Harantol Snake हरणटोळ साप अर्थात ग्रिन व्हाईन स्नेकच्या बाबत समाजात असलेल्या गैरसमजामुळे त्यांची हत्या होत असल्याने त्यांची संख्या कमी होत असल्याचे निरिक्षण वन्यप्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना नोंदविले आहे. माणगाव तालुक्यांतील जैवविविदता समृद्ध जंगलात शुक्रवारी हरणटोळ साप अर्थात ग्रिन व्हाईन स्नेकचे दर्शन झाले, त्या निमीत्ताने कुवेसकर बोलत होते.
हरणटोळ ग्रामीण भागात सापटोळ असेही म्हटले जाते. गावातील जंगलात आणि शहरातील वृक्षराजीतही त्याचे अस्तित्व असेत, मात्र अलिकडच्या पाचसहा वर्षात त्यांचे दर्शन दुर्मीळ होत चालेले आहे. हरणटोळचे वास्तव्य हिरव्यागार झाडांवर असते. जमीनीवर तो फार क्वचीत येतो. माणसाच्या डोक्यावर तो दंश करतो असा एक मोठा गैरसमज आहे आणि त्यातून त्याची मोठ्या प्रमाणात हत्या होते परिणामी त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे प्राणी अभ्यासकांचे निरिक्षण असल्याचे कुवेसकर यांनी सांगीतले. हरणटोळ मध्यम विषारी साप आहे. त्याच्या विषाने मृत्यू होत नसला तरी त्याच्या चावण्या पासून मोठ्यां मधमाशीच्या डंखाप्रमाणे जळजळ होते. आजपर्यंत याच्या चावण्याने माणसाचा मृत्यू झाला असल्याची नोंद आढळून आली नसल्याचे कुवेसकर यांनी सांगीतले.