Maharashtra beaches Blue Flag award |गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग'चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग'चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
Maharashtra beaches Blue Flag award
Maharashtra beaches Blue Flag award
Published on: 
Updated on: 

मुंबई : कोकणातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा 'ब्लू फ्लॅग' हा अंतिम पुरस्कार जाहीर झाला आहे.

नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी ही माहिती दिली आहे. डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत लवकरच या समुद्रकिनाऱ्यांना अधिकृत 'ब्लू फ्लॅग' प्रदान करण्यात येणार आहेत.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन राज्यातील पर्यटनस्थळांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रयत्नांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Maharashtra beaches Blue Flag award
Sangli News : पलूस शहरात विजापूर–गुहागर महामार्गावर सुरक्षा धोक्यात

'ब्लू फ्लॅग' हा जगभरात मान्यता प्राप्त असलेला पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांसाठीचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जनजागृती आणि शाश्वत व्यवस्थापन अशा विविध निकषांच्या आधारे हा पुरस्कार प्रदान केला जातो.

Maharashtra beaches Blue Flag award
Ratnagiri News : चिपळूण, गुहागर तालुक्‍यांत भातशेतीवर करपा रोग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.