गुढीपाडव्याला शुभारंभ : हापूस ओळखताना होतोय गोंधळ... तर या Tricks वापरुन बघा

Raigad News | रंग, आकार, गंधावरून ओळखा हापूस: देवगड जीआय रजिस्टर शेतकर्‍यांना टॅपलप्रूफ यूआयडी
कणकवली, रायगड
हापूस आंबाPudhari News Network
Published on
Updated on

कणकवली : अजित सावंत

फळांचा राजा आंबा म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो देवगडचा हापूस आंबा. देवगड हापूसची चव केवळ भारतापुरतीच नव्हे, तर जगभरातील आंबा खवय्यांना हवीहवीशी वाटणारी चव आहे.

Summary

गेल्या काही वर्षांपासून याच देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातीचे आंबे देवगड हापूस म्हणून माथी मारून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेमार्फत जीआय रजिस्टर आंबा उत्पादक शेतकर्‍यांना यूआयडी युनिक कोड दिला आहे. या कोडच्या माध्यमातून देवगड हापूसची खात्री ग्राहकांना पटवून अस्सल चव चाखता येत आहे.

देवगड हापूस ओळखण्यासाठी रंग, आकार आणि सुगंधावरूनही त्याची पारख करता येते. देवगड हापूस हा काहीसा गोलाकार, तांबूस-पिवळसर, त्याची साल पातळ असते आणि सुगंधही चटकन येतो. यासाठी ग्राहकांचा चोखंदळपणा आणि जागरूकता तितकीच महत्त्वाची असते. गुढीपाडव्याच्या शुभारंभी देवगड हापूस आता स्थानिक मार्केटमध्ये अवतरला असून, त्याची किंमतही 1,500 रुपये डझन इतकी वधारलेली आहे.

नववर्षापासून पुढील महिनाभर हापूसची आवक वाढणार असून, मे महिन्यात मात्र आंबा फार कमी असेल, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. खरे तर गुढीपाडव्याला आंब्याची पारंपरिकपणे पूजा करून आंबा बाजारात विक्रीसाठी उत्पादकांकडून पाठविला जातो. बाजारात काही प्रमाणात हापूस आंबा विक्रीसाठी आला असून, सध्या 900 ते 1,300-1,500 रुपयांपर्यंत डझनाचा दर आहे.

आंब्याचा सिझन सुरू

दुसर्‍या टप्प्यातील आंब्याचा सिझन आता सुरू होऊन एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक वाढेल, असे सांगण्यात आले. सध्या देवगडमध्ये पिकलेल्या हापूस आंब्याचा दर 800 ते 1,500 रुपये डझन, तर हिरव्या आंब्याचा दर 700 ते 1,200 रुपये डझन आहे.

गेल्या काही वर्षांपासून देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातीचे आंबे विकून ग्राहकांची फसवणूक होताना दिसते. ज्या ठिकाणी देवगड हापूसचे उत्पादन होते त्या भागात देवगड हापूसचा डझनी दर 900 ते 1,500 रुपये असताना औरंगाबाद, पुणे, नागपूर अशा भागांमध्ये 600 रुपये दराने देवगड हापूसच्या नावाखाली आंबा विकला जातो. बरेचदा सिंधुदुर्गातील वर्तमानपत्रांच्या रद्दीत कर्नाटकी आंबे पॅक करून देवगड हापूसच्या नावाखाली विकले जातात. यामध्ये ग्राहकांची फसवणूक होते.

देवगड हापूस बाहेरून ओळखावा तरी कसा?

  • देवगड हापूस आंबा- युनिक कोड नसेल तर देवगड हापूस बाहेरून ओळखावा तरी कसा? असा प्रश्न ग्राहकांना पडतो. देवगड हापूस आंबा काहीसा गोलाकार, वरून तांबूस-पिवळसर आणि कडक असतो; मात्र त्याची साल पातळ असते. देवगड हापूसमध्ये रसाचे प्रमाण फार कमी असते. तो खाल्ल्यावर त्याची चव लगेच समजते आणि सुगंधही पटकन येतो

  • कर्नाटकी हापूस आंबा - कर्नाटकी आंब्याची साल काहीशी जाडसर, वरून पिवळसर व खालून हिरवट, आकार काहीसा उभट असतो. या आंब्याला सुगंध येत नाही व चवही तितकीशी नसते. यासाठी ग्राहकांनी चोखंदळपणे तपासून घेणे आवश्यक असल्याचे आंबा उत्पादक सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news