अपघातग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाची योजना कार्यान्वित

Gopinath Munde Shetkari Apaghat Surakasha Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनाPudhari News Network
Published on
Updated on

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

शेतकरी वा कुटुंबातील सदस्याचा अपघाताने मृत्यु झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ यांनी केले आहे.

शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच इतर कारणामुळे बर्‍याच वेळा अपघात होतो व त्यांना अपंगत्व येते किंवा मृत्यू ओढावतो परिणामी कर्त्या पुरुषाच्या अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण होते तसेच त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. याकरिता त्यांच्या वारसास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शासनाने कार्यान्वित केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई वडील, लाभार्थीचे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील दोन जणांना या योजनेचा लाभ घेता येईल. एखाद्या शेतकर्‍याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास रुपये 2 लाख रक्कम नुकसान भरपाई देण्यात येते.

शेतीची कामे करताना अपघातामुळे अवयव निकामी झाल्यास रुपये 1 लाख नुकसान भरपाई देण्यात येते. शेतकर्‍याच्या कोणत्याही वारसदाराने शासनाच्या विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.

योजनेअंतर्गत समाविष्ट अपघाती कारणे

  • खाली दिलेल्या कारणामुळे शेतकर्‍यांना अपंगत्व किंवा मृत्यू ओढवल्यास या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

  • अंगावर वीज पडून मृत्यू होणे

  • नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहनअपघात

  • विजेचा शॉक लागून मृत्यू

  • रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू,

  • जंतुनाशके हाताळताना, अन्य कारणामुळे विषबाधा, उंचावरून पडून अपघात

  • नक्षलवाद्यांकडून हत्या, हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

दावा अर्ज, 7/12, अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक बँकेचे नाव,बचत खाते क्रमांक, शिधापत्रिका,एफ आय आर, अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल अकस्मात मृत्यूची खबर इंनक्वेस्ट पंचनामा वाहन चालविण्याचा वैध परवाना मृत्यू दाखला अपंगत्वाचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो वयाचा दाखला अपघात घटनास्थळ पंचनामा पोष्ठ मार्टेम रिपोर्ट वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक, औषधोपचाराचे कागदपत्रे , प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र / जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

  • मृत्यूच्या कारणाची नोंद सक्षम प्राधिकार्‍याने स्पष्ट केली असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल) या कागदपत्राची आवश्यकता राहणार नाही.

  • जेव्हा शेतकर्‍याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/ शेतकर्‍यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करावा. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी संबंधिताना मार्गदर्शन करतील.

  • अपघातग्रस्त शेतकर्‍याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करुन अहवाल तहसीलदारांना घटना झाल्यापासून 8 दिवसाच्या आत सादर करतील.

  • तालुका कृषि अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार छाननी करुन मंजुर प्रस्ताव, नामंजुर प्रस्ताव कारणासहित व कागदपत्रांअभावी अपुर्ण प्रस्ताव या वर्गवारीनुसार संबंधित तहसिलदार यांचेकडे सादर करतील व मुळ प्रस्तांवांचे जतन तालुका कृषि अधिकारी स्तरावरच करण्यात येईल.

  • तहसिलदार यांचे अध्यक्षेतेखालील समितीच्या बैठकीमध्ये 30 दिवसाच्या आत संबंधित शेतकरी/ शेतकरी कुंटूंबाच्या वारसदारांना लाभ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येवून संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/ वारसदारांच्या बँक खात्यात एउड व्दारे निधी अदा करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news