Goods Train Derails In Panvel: मालगाडी रुळावरून घसरली; २२ तासांपासून दुरूस्तीचे काम सुरू

Goods Train Derails In Panvel: मालगाडी रुळावरून घसरली; २२ तासांपासून दुरूस्तीचे काम सुरू
Published on
Updated on

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : पनवेल रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी दुपारी वसईच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. यात मालगाडीचे ५ डब्बे रुळावरून खाली उतरले होते. तर 4 डब्बे पलटी झाले होते. या अपघातामुळे रेल्वे ट्रक उखडले होते, ट्रॅकमधील स्लीपर लाईन तुटल्या होत्या. दरम्यान, 22 तासानंतर विराट क्रेनच्या माध्यमातून पलटी झालेले 5 डब्यांपैकी 3 डब्बे बाजूला काढण्यात आज (दि.१) सकाळी ११ वाजता सेन्ट्रल रेल्वेला यश आले. Goods Train Derails In Panvel

अन्य एक डब्बा आणि ब्रेक व्यागण बाजूला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामामुळे कोकण तसेच दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर, अनेक रेल्वे एक्सप्रेस पनवेलला न आणता पुणे, ठाणे मार्गावरून मार्गस्थ करण्यात येत आहे. या घटनेचा कोकण रेल्वे लाईनला  मोठा  फटका बसला आहे. Goods Train Derails In Panvel

तीन जेसीबी, तीन पोकलन च्या मदतीला
सेन्ट्रल, हर्बर लाईनचे शेकडो कर्मचारी दिवस रात्र कामात
50 टक्के रेल्वे ट्रक बदलण्यात रेल्वे प्रशासनाला यश
विराट क्रेन च्या मदतीने रुळावरून घसरलेले डब्बे केले बाजूला
पनवेल कडे येणारी पॅसेंजर ची वाहतूक ठप्प
सकाळच्या चार पॅसेंजर एक्सप्रेस केल्या रद्द

 Goods Train Derails In Panvel खालील ट्रेन करण्यात आल्या रद्द

1)10103 सीएसएमटी-मडगांव मांडवी एक्सप्रेस
जेसीओ 1/10/23
2) 01165 एलटीटी मंगलुरु एक्सप्रेस, जेसीओ 30/9/23
3) 11007 सीएसएमटी पुणे एक्सप्रेस
जेसीओ 1/10/23
4) 11008 पुणे-सीएसएमटी एक्सप्रेस
जेसीओ 1/10/23

 वाहतुकीत करण्यात आला बदल

1) 12133 सीएसएमटी मंगलुरु एक्सप्रेस-
जेसीओ 30/9/23,
कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंढा मार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहे.

2) 12051 सीएसएमटी मडगांव एक्सप्रेस-
जेसीओ 1/10/23
कल्याण-लोणावळा-पुणे-मिराज-लोंढा या मार्गाने वाहतूक करण्यात येणार आहे

3) 12125 सीएसएमटी पुणे एक्सप्रेस
जेसीओ 1/10/23
लोणावळा-कर्जत-कल्याण मार्ग पुढे जाणार आहे. पनवेलला येणार नाहीत.

4) 12126 पुणे सीएसएमटी एक्सप्रेस
जेसीओ 1/10/23
कल्याण-कर्जत-लोणावळा मार्गात बदल

5) 17317 हुबली दादर एक्सप्रेस-
जेसीओ 30/9/23
लोणावळा-कर्जत-कल्याण मार्गात बदल

रेल्वे मार्गात बदल

1) 17613 पनवेल-नांदेड एक्सप्रेस-
जेसीओ 1/10/23
पनवेल रेल्वे स्थनाकाऐवजी पुणे रेल्वे स्थनाकातून ही गाडी सुरू होणार

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news