खालापूर : हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या सुवर्णकाराचे दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर घडली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर हातकणंगले येथील सुवर्णकार संदीप आण्णासो म्हेतर(वय 48) हे 26 सप्टेंबर रोजी मुंबई येथून कोल्हापूर येथे जाण्यासाठी नाकोडा ट्रॅव्हल्सच्या बसने निघाले होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना बस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीत उडपी हॉटेल जवळ जेवणासाठी थांबली होती. संदीप जेवणासाठी बसमधून खाली उतरले होते. त्याच दरम्यान पाळत ठेवून असलेल्या चोरट्यानी संदीप यांची दागिन्यांची बॅग चोरून नेली . बॅगेमध्ये 4 लाख 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कर्णभूषण, 1 लाख 22 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या असे एकूण साडेपाच लाख रुपये किंमतीचे दहा तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
याबाबत आज्ञा चोरट्याविरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शितल कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अभिजीत व्हरांबळे आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांचा ऐवज लंपास करण्याच्या अधूनमधून घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये नागरिकांचा मोठा किमती ऐवज चोरी होत आहे. आतापर्यंत मोठा ऐवज चोरी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना आपल्याकडील रोख रक्कम, दागदागिने यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.