Gold Theft | रेल्वेत प्रवाशाला झोप लागताच साधला डाव, 18 तोळे सोने लांबविले

अलिबागमधील दोघांना अटक
Gold Theft
रेल्वेत प्रवाशाला झोप लागताच साधला डाव, 18 तोळे सोने लांबविलेfile photo

अलिबाग : रेल्वे प्रवाशाचे 18 तोळे सोने चोरणारा व ते सोने विकत घेणार्‍यास रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी प्रसाद पाटील हा अलिबाग तालुक्यातील भेरसे येथील आहे. तर सोने विकत घेणारा अरुण घोटणे हा अलिबाग शहरातील आहे. चोरीची ही घटना 26 मे 2024 रोजी रेल्वेत घडली होती. चोरीस गेलेल्या 18 तोळे सोन्यापैकी 13 तोळे सोने मिळवण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे.

याप्रकरणी अन्नमा जोसफ (56, रा. केरळ, सध्या रा. डोंबिवली) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, त्या संपर्कक्रांती एक्स्प्रेसमधून केरळ ते मुंबई प्रवास करत होत्या. त्यांना कोकण रेल्वे मार्गावरील आडवली ते रत्नागिरी दरम्यान झोप लागली. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांची बॅग व 18 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. जोसेफ यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर एक महिन्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी चोरट्याला पकडले. प्रसाद जगन्नाथ पाटील (30, रा. भेरसे, अलिबाग, रायगड) असे चोरट्याचे नाव आहे. तो मडगाव येथील पोलिसांच्या खबर्‍यांच्या संपर्कात होता. ही बाब लक्षात येताच शहर पोलिसांनी 28 जूनला त्याला मडगावहून अटक केली. तपास करताना एका एटीएममध्ये पैसे काढत असताना आरोपी सीसीटिव्हीमध्ये कैद झाला. चोरलेले सोने कुठे नेले याचा तपास केला.

दोघांना अटक

अरुण जनबा घोटणे याला विकल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी अरुण घोटणे यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून 18 तोळे पैकी 13 तोळे सोने जप्त करण्यात यश मिळवले. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हो चोरी उघडकीस आणलीच परंतु दोन मुख्य संशयिताना जेरबंद करतानाच मुद्देमाल सुद्धा जप्त केला.

यांनी केली कामगिरी

ही कामगिरी शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिपक साळवी, पोलिस हवालदार अरुण चाळके, राहूल जाधव, अमोल भोसले, पोलिस नाईक पंकज पडेलकर, आशिष भालेकर, भालचंद्र मयेकर पोलिस शिपाई अमित पालवे यांनी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news