Crocodile Found | पाभरे पंचक्रोशीत ओढ्यात सापडली महाकाय मगर

वनक्षेत्रपालांचे जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
Giant crocodile found in Pabhare Panchkroshi stream
पाभरे पंचक्रोशीत ओढ्यात सापडली महाकाय मगरPudhari Photo
Published on
Updated on
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यातील पाभरे गावाच्या हद्दीतील चिंचोढे रस्त्यालगतच्या नदी पात्राचे ओढ्यात 13.4 फूट लांबीची 230 किलो वजनाची मगर आढळली आहे. स्थानिक नागरिकांनी म्हसळा वन विभागाचे वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे यांना मगर असल्याची माहिती देताच त्यांनी सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांना घटनास्थळाची माहिती दिली.

रेस्कु टीम तासाभरात घटनास्थळी पोचून बचाव कार्य सुरू केले. मगरीचा आकार मोठा असल्याने शिताफीने बचाव कार्य सुरू केले होते. वनविभाग म्हसळा, वनकर्मचारी पाभरे आणि रेस्कू टीमने मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले असल्याचे सांगितले.

चिचोंडे येथील ओढयात मगर असल्याची माहिती पाभरे परिसरात हा हा म्हणता वार्‍यासारखी पसरली आणि बग्यांची गर्दी वाढली. याच आठवड्यात शाळांना दीपावलीची सुट्टी पडते. शालेय विद्यार्थी सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी नदी, नाले, ओढ्याचे पाण्यात पोहण्यासाठी जातात त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिक यांनी काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन म्हसळा वनक्षेत्रापाल संजय पांढरकामे यांनी केले आहे.

मगर पकडण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी वनक्षेत्रापाल संजय पांढरकामे, वनपाल प्रवीण शिंदे, वनपाल वैभव शिंदे, वनरक्षक शशिकांत चेवले, वनरक्षक गजानन छोटे, वनरक्षक रुपेश देवरे, वनरक्षक सतीश खरात, वनरक्षक सागर घुबे, वनरक्षक चरण चव्हाण आदींनी मेहनत घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news