

पोलादपूर ः समीर बुटाला
नाजूक दुर्वा, मिनावर्क केलेली जास्वंदाची फुले, रेखीव मोदक, रत्नजडित मुकुट, कोरीव काम केलेले हार, छोटासा उंदीर. यासंह असंख्य प्रकारचे चांदी आणि सोन्याचे दागिने सह शोभेचे दागिने लाडक्या गणरायासाठी बाजारपेठ दाखल झाले आहेत. घरी येणार्या गणरायाला विविध प्रकाराच्या अलंकारांनी सजविण्याची भक्तांची इच्छा ओळखून बाजारपेठ मध्ये दागिने उपलब्ध झाले आहे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेल्या या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळाली आहे.
गणपतीच्या सजावटीतील लहान वस्तूपासून ते त्याच्या आभूषणांपर्यंत प्रत्येक निर्णयाबद्दल नागरिक खूप चिकित्सक आहेत. दर वर्षी गणपतीसाठी नावीण्यपूर्ण सजावट करण्याबद्दल ते आग्रही असतात. यातूनच गणपतीसाठी दागिने करण्याची लाट गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आली आहे. गणपतीचे बहुतांश चांदीचे दागिन्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने दरवर्षी या दागिन्यांची मागणी वाढते आहे.
चोखंदळ ग्राहकांसाठी कारागीरांनीही असंख्य प्रकारचे दागिने तयार केले आहेत. अवघ्या पाच ग्रॅमपासून विविध प्रकारात चांदीचे दागिने उपलब्ध आहेत. दरम्यान,सध्या बाजारात खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जाणवत आहे.
ग्राहकांचा कल वाढतोय
गणेश अलंकार, पूजा साहित्य असे सेट तयार केले असल्याचे पाहवयास मिळत आहेत. भेट देण्यासाठी देखील या सेटची खरेदी होते आहेत. अवघ्या शंभर रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत या वस्तूंच्या किमती आहेत. गेल्या काही वर्षात गणपतीच्या चांदी आणि सोन्यांच्या अलंकारांमध्ये भरपूर प्रकार उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा दर वर्षी प्रतिसाद वाढतो आहे.
गणपतीचे अलंकार, पूजा साहित्य, फळे आणि फुलांमध्येही अनेक प्रकार आहेत. या वर्षी चांदीच्या अलंकारांबरोबर सोन्याचे दागिने घेण्याचा कल वाढलेला दिसतो आहे.सध्याच्या जमान्यात शोभेच्या दागिन्यांची दालने गणपती साठी सज्ज झाले आहेत अनेक गणेशभक्त शोभेचे तसेच चांदीचा वर्क असलेले राजवटीचे साहित्य खरेदी करत आहेत