Raigad News : उत्सव गणरायाचा! जागर पर्यावरणाचा; 43.98 टन निर्माल्यावर पर्यावरणपूरक प्रक्रिया

महापालिकेच्या वतीने पनवेलमध्ये पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची अंमलबजावणी
Nirmalya recycling
उत्सव गणरायाचा! जागर पर्यावरणाचा; 43.98 टन निर्माल्यावर पर्यावरणपूरक प्रक्रिया pudhari photo
Published on
Updated on

पनवेल : पनवेल महापालिकेतर्फे यावर्षी दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या सहभागामुळे कचर्‍याचे योग्य विभाजन याबाबतच्या जनजागृतीमुळे तब्बल 43.98 टन निर्माल्याचे संकलन केले करण्यात आले.

महापालिकेने पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून दिला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात पनवेल महापालिकेतर्फे निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनाला तसेच निर्माल्य संकलन रथास भाविकांनी यावर्षीही चांगला प्रतिसाद दिला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनूसार विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने यावर्षीच्या गणेशोत्सव काळामध्ये श्रींच्या मूर्तीसोबत विसर्जन स्थळी आणले जाणार्‍या श्री गणेश मूर्तीच्या गळ्यातील फुलांचे हार, सजावटीचे सामान पुष्पमाला, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोग्य निर्माल्य टाकण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत प्रत्येक विसर्जन ठिकाणी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.

निर्माल्य नैसर्गिक किंवा कृत्रिम तलावामध्ये टाकण्यास पनवेल महापालिकेकडून प्रतिबंध करण्यात आला होता. या उपक्रमास गणेश भक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विसर्जन वेळी घरगुती गणेशोत्सवातील निर्माल्य आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये दररोज निर्माण होणार्‍या निर्माल्याचे संकलन 4 विशेष निर्माल्य संकलन रथाद्वारे करण्यात आले. निर्माल्य रथांच्या माध्यमातून गणशोत्सवाच्या कालावधीत जवळपास 43 टन 980 किलो निर्माल्य जमा झाले. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीतील निर्माल्य जमा करून, निर्माल्य प्रक्रिया केंद्रांच्या ठिकाणी पोहोचवून त्यावर पर्यावरण पूरक प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

Nirmalya recycling
Mumbai footpath hawkers : फेरीवाल्यांचा पुन्हा कब्जा

पनवेल महानगरपालिका नेहमीच पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देते. यावर्षी गणेश भक्तांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे निर्माल्य संकलन आणि त्याच्या पर्यावरणपूरक प्रक्रियेमध्ये अपेक्षित यश मिळाले आहे. निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर करून महापालिकेच्या बगीचे आणि पार्क मधील झाडांसाठी याचा सुयोग्य वापर करण्यात येणार आहे. धार्मिक श्रद्धा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहचविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.

  • यापैकी 7 हजार 865 किलो निर्माल्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी संकलित केले असून त्यावर पर्यावरणपूरक प्रक्रिया नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचेमार्फत करण्यात येणार आहे.

निर्माल्य संकलन (किलोमध्ये)

प्रभाग समिती कळंबोली

निर्माल्य संकलन -16,045

प्रभाग समिती खारघर

निर्माल्य संकलन - 12,005

प्रभाग समिती कामोठे

निर्माल्य संकलन -9,260

प्रभाग समिती पनवेल

निर्माल्य संकलन -4,425

प्रभाग समिती नावडे उपविभाग

निर्माल्य संकलन 2,245

एकूण निर्माल्य

43,980 किलो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news