

रायगड : सागर जैन
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या ईर्टिगा कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना रायगड जिल्ह्यात घडली. आगीने काही वेळातच संपूर्ण वाहनाला वेढा घेतला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना वेळीच कारमधून बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कार जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच पेण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून कारला लागलेली आग आटोक्यात आणली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील प्रवाशांचा जीव वाचल्याने मोठा अनर्थ टळला.