

Fungus in Puran Poli
विक्रम बाबर
पनवेल : कामोठे सेक्टर २१ मधील न्यू जोधपूर स्वीट अँड नामकीन या दुकानातून विकत घेतलेल्या पुरण पोळीला बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी कामोठे येथील एका रहिवाशाने या दुकानातून पुरण पोळी विकत घेतली होती. परंतु पॅक उघडल्यावर पोळीच्या वरच्या थरावर बुरशी दिसल्याने त्यांना अक्षरशः धक्का बसला. सुदैवाने ही पुराण पोळी खाण्यात आली नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, दुकानदाराचा हलगर्जी पणा चव्हाट्यावर आला आहे.
कामोठे सेक्टर २१ मध्ये राहणारे रहिवाशी यांनी घरातील लहान मुलांना खाण्यासाठी सेक्टर २१ मधील आशापुरा रिंगलिया सोसायटी मधील " न्यू जोधपुरी स्वीट अँड नामकीम " या शॉपमधून , स्वीट्स आणि विशेष म्हणजे पुरण पोळी विकत घेतली, घरी गेल्या नंतर मुलानी पुराण पोळीचे पॅकेट उघडून पोळी खाण्यास सुरवात केली. यावेळी घरातील जेष्ठ सदस्यांना लक्षात आले की, पोळीला बुरशी लागली आहे. हातात घेतल्या नंतर, बुरशी आणि बुरशीच्या तारा दिसून आल्या आणि पोळीमधील पुरण खराब होऊन वास मारू लागला होता.
तत्काळ ही पोळी खाण्यास घरातील लहान मुलांना घरातील जेष्ठ सदस्यांनी रोखले आणि हा सर्व प्रकार पाहून घरातील सदस्य थक्क आहे. त्या नंतर घरातील सदस्यांनी या बाबत माहिती घेतल्यानंतर सदर पोळी पार्श्व फुड्स पुरण पोळी या कंपनीची असल्याचे समोर आले, आणि ही पोळी करंजाडे शहरात राहणारे, मयुर शहा हे बनवत असल्याचे समोर आले आहे. शहा हे या पोळीचे वितरण नवी मुंबई परिसरात करतात, कामोठे मधील घडलेल्या या प्रकरणामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पोळी विकणाऱ्या स्वीट मार्ट दुकान चालक चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कामोठे शहरात या घटना वारंवार घडू लागल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि अन्न औषध प्रशासनाच्या कारभारा वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
१० ऑक्टोबर ही तारखी त्या पुराण पोळी ची एक्सपायरी डेट होती. त्यामुळे न्यू जोधपुरी स्वीट विक्रेत्याने या पोळीची विक्री थांबवली पाहिजे होती. एक्सपायरी झालेला माल आम्ही रिटर्न देखील घेतो, मात्र दुकान मालकाने आम्हाला याबाबत सांगितले नाही.
- शहा मालक, पार्श्व फुड्स