Full length statue of Chhatrapati Shivaji Maharaj unveiled at Rohe
रोह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणPudhari Photo

रोह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

महाराजांचे स्वराज्य समजून घेण्याची वेळ आलीय : युवराज संभाजीराजे छत्रपती
Published on

रोहे : महादेव सरसंबे

कुंडलिका नदी संवर्धन येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळा उभारला आहे. त्यांचा अनेकांना आदर्श घ्यावे असा पुतळा आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केले तर चिंतन करण्याची वेळ साडेतीनशे वर्षानंतर आली आहे. जगात कुठल्याही देशात असा राजा तुम्हाला पाहायला मिळणार आणि म्हणून मग खर्‍या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्वराज्य काय होते हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे, असे प्रतिपादन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने रोहा शहरातील कुंडलिका नदी संवर्धन येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य व महाराष्ट्रातील आत्तापर्यंत सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण प्रसंगी युवराज संभाजीराजे छत्रपती बोलत होते. यावेळी त्यांनी रायगडच्या पायथ्याशी शिवसुष्टी उभारणार आहोत. याकडे खा.सुनील तटकरे यांनी लक्ष घालावे असे आवाहन केले.

यावेळी सरखेल रघुजीराजे आंग्रे, खा.सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे, शिवाजी महाराजांच्या काळातील मावळ्यांचे वंशज युवराज जेधे, रवींद्र कंक, प्रदीप मरळ, मंगेश शिळीमकर, विष्णुपंत पासलकर, अमितदादा गायकवाड, समिर जाधवराव, आनंदा काशिद, रामदास धुमाळ, दिग्विजय शितोळे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी अजय एडके, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवल, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, नंदकुमार म्हात्रे, आदी उपस्थित होते.

युवराज संभाजीराजे छत्रपती मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपण रायगड संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी खा. सुनील तटकरे यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला अशा ठिकाणी तिथे संवर्धन जतन करणे म्हणजे हे एक स्पेशालिस्टी लागते आणि म्हणून राजे तुम्ही ही जबाबदारी घेतली नाही तर दुसरा कोण घेणार त्यावेळी मला सांगितले की राजे तुमच्या शिवाय पर्याय नाही. अनिकेत तटकरे तुमचे मनापासून कौतुक याच्यासाठी करायचे की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपल्यासाठी स्थापन करून दिले आज साडेतीनशे वर्षांनंतर आपण शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने जयजयकार करतो, ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याचा आदर्श घेतो. शिवाजी महाराजांनी अठरापगड जात व 12 बलुतेदारांना घेऊन काम केले. अनेक सामान्य ते सामान्य मावळे हे त्यावेळेस सरदार झाले त्यांचे वंशजांना आज तुम्ही बोलवले याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. भव्य पुतळा उभारला आहे. त्यांचा अनेकांना आदर्श घ्यावे असा पुतळा आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केले तर चिंतन करण्याची वेळ आली साडेतीनशे वर्षानंतर. ज्यांचा आपण आजही वंदन करतो. आपण अभिवादन करतो. शिवाजी महाराज आपल्या मनात, हृदयात आहेत. स्वराज्य जे कुठल्याही जगात कुठल्याही देशात असा राजा तुम्हाला पाहायला मिळणार आणि म्हणून मग खर्‍या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्वराज्य काय होते हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हा सोहळा ऐतिहासीक व अविस्मरणीय आहे. शिवसुष्टीचा पहीला टप्पा होत आहे. रोहेकरांची इच्छा होती सर्वात उंच पुतळा बसविण्यात यावे. आज विशेष अभिमान आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला दाखवायचा आहे. त्याचीही सुरुवात ही रायगडपासून व्हावी हीच आमची इच्छा आहे. त्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा म्युझियम पुढच्या कालावधीमध्ये उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

माजी आ.अनिकेत तटकरे यांनी आपल्या प्रास्ताविकात पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होत असल्याने हे आमचे भाग्य आहे. तीन वर्षापुर्वी प्रवास सुरु केले. पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावे अशी इच्छा होती. आज ते पुर्ण होत आहे. राज्यात सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोहयात उभारण्यात आले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. लवकरत या ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. लवकरच लेजर शो च्या माध्यमातून जीवनपट या ठिकाणी दाखविण्यात येणार आहे. असल्याचे सांगितले. यांनी व्यक्त केले. यावेळी रघुजीराजे आंग्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहे. देशाचे मानबिंदू आहेत. जगाच्या पाठीवर शौर्याचे प्रतिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे. जगाच्या पाठीवरती चंद्र-सूर्य तारे असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास या जगाच्या पाठीवरती अजोड त्या ठिकाणी राहील. त्यांना साजेल असे शिवस्मारक कुंडलिका नदीच्या तिरावर साकारणार आहे.

- सुनील तटकरे, खासदार

भव्य-दिव्य आणि अविस्मरणीय सोहळा

रोहे मेहेंदळे हायस्कूल येथून सायंकाळी पाच वाजता भव्य अशी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत विविध राजकीय पक्षाचे नेते, शिवप्रेमी, रोहेकर नागरिक सामील झाले होते. शिवाजी महाराजांची पालखी या मिरवणुकीतून निघाली असून ढोल ताशे, शिवकालीन आखाडे, लेझीम, शिवकालीन विविध कसरती सुरेख अशा रांगोळ्या ठिकठिकाणी पताके व रोहेकरांनी उत्स्फूर्तपणे शिवाजी महाराजांचे केलेले स्वागत हे पाहता रोह्यामध्ये भव्य व दिव्य स्वरूपात अविस्मरणीय हा कार्यक्रम झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news