रागाच्या भरात मित्राची हत्या; २४ तासांत संशयिताला बेड्या

डोक्यात लोखंडी रॉड मारून केली हत्या..!
Friend killed friend; Suspect arrested within 24 hours
रागाच्या भरात मित्राची हत्या; २४ तासांत संशयिताला बेड्याFile Photo
Published on
Updated on

पनवेल : विक्रम बाबर  

भांडणाचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या करण्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपीच्या  मुसक्या आवळण्यात कामोठे पोलिसांना यश आलेले आहे. या संशयित आरोपीला कामोठे पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे. हत्या करून संशयित मूळ गावी फरार होण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली. कामोठे पोलिसांच्या या कामगिरीने पोलिसांचे कौतुक होऊ लागले आहे.

छोटुकुमार रामश्रेष्ठ राय (वय २९ वर्षे) राहणार बिहार असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. छोटुकुमार ने त्याचा मित्र कृष्णाकांत रमा पांडे (वय २९) राहणार उत्तरप्रदेश याची शुक्रवारी दि. १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री हत्या केली होती. या हत्येप्रकरणी कामोठे पोलिसांनी छोटुकुमार याला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून अटक केली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या २४ तासात अटक करून त्‍याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

छोटुकुमार राय आणि कृष्णाकांत पांडे हे दोघे कामोठे सेक्टर ५ येथील आयुषी इपायर बांधकाम साईटवर कामाला होते. छोटुकुमार हा या बांधकाम साईटवर सुतारकाम करत होता, तर मृत कृष्णाकांत राय हा या साईटवर  वॉचमन म्हणून काम करत होता. या साईटवर काम करत असताना दोघांमध्ये चांगली ओळख आणि मैत्री झाली होती. मात्र शुक्रवारची रात्र ही दोघांच्या मैत्रीची काळ रात्र ठरली. कारण या दिवशी दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला आणि दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. याच वेळी छोटूकुमार यांने साईटवर असलेला लोखंडी पाईप ( रॉड ) हातात घेतला आणि कृष्णाकांतला मारू लागला. यावेळी डोक्यात मार लागल्यानंतर कृष्णाकांत रक्ताच्या थारोळ्यात पडला.

कृष्‍णाकांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून छोटुकुमारने घटनास्थळावरून पळ काढला आणि फरार झाला, त्यानंतर या घटनेची माहिती कामोठे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्याच वेळी कृष्णाकांत याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कामोठे पोलिसांनी वेळ न घालवता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरवात केली. एक विशेष पथक तयार केले. या पथकात सहायक पोलीस निरिक्षक राकेश पगारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत तायडे, पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोलीस हवालदार संजय झोळ, मनोज माने तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस तपासला सुरवात केली.

तांत्रिक बाबी तपासून पाहताना संशयित आरोपी हा फरार होण्याच्या तयारीत असल्याची पोलिसांना महिती मिळाली, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता पोलिसांना माहिती मिळाली की, संशयित छोटुकुमार हा त्याच्या राहत्यागावी जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे असून, रेल्वेची वाट पाहत आहे. या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस गाठून त्याला शिताफीने अटक केली. अटक केल्यानंतर संशयिताला कोर्टात हजर केले असता, छोटुकुमारला न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी बजावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news