Fraud in Uran | उरणच्या बंटी-बबलीने डॉक्टर दाम्पत्याला घातला 3 कोटींना गंडा

परदेशात शिक्षण, नोकरीच्या आमिषाने फसवणूक
Fraud News
उरणच्या बंटी-बबलीने डॉक्टर दाम्पत्याला घातला 3 कोटींना गंडाFile Photo
Published on
Updated on

कोप्रोली : नेरुळ, सीवूड येथे राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याला तब्बल ३ कोटी ३० लाखांचा उरणमधील जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी- बबलीच्या जोडीने गंडा घातला आहे. परदेशात मुलांना शिक्षण आणि डॉक्टर दाम्पत्याला नोकरी देतो, असे सांगून ही फसवणूक केली असल्याचे, एनआरआय पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लिव्ही ओव्हरसीज स्टडीज या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत कलम ४०६, ४२०, ४६५ नुसार २० जुलैला बेलापूर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summary

फसवणुकीपासून सावध राहा

फसवणूकीच्या या सर्व प्रकारामध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या दोनही मुलांचे लिव्ही ओव्हरसीज स्टडी या कंपनीकडून दोन शैक्षणिक वर्षांचे नुकसान करण्यात आले असून, मुलांचे घेतलेले मूळ कागदपत्रे देखील दिलेले नाहीत. यामुळे मुलांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येणार आहेत. यासाठी अशा फसवणूक करणाऱ्या संस्थांपासुन मुलांच्या भवितव्यासाठी

तळमळ बाळगत आपल्या आयुष्याची पुंजी अथवा कर्ज काढून मुलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पालकांनी सावध रहाण्याची नितांत गरज असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले.

फसवणुक झालेले डॉक्टर दाम्पत्य सी वूड्स, नवी मुंबई येथे राहतात. उरण करंजा भागात राहणाऱ्या जुगनू चिंतामण कोळी आणि तेजस्वी जुगनू कोळी या बंटी, बबलीच्या जोडीने या दोघांना खोटे आमिष दाखवून टप्याटप्याने तब्बल ३ कोटी ३० लाख रुपये उकळले.

नेमकी कशी केली फसवणूक?

जुगनू आणि तेजस्वी कोळी यांचे अपत्य याच डॉक्टरांच्या प्रसूतीगृहामध्ये जन्मास आले होते. यामुळे डॉक्टर आणि कोळी कुटुंब यांच्यात ओळख होती. जुगनू कोळी याची लिवी ओव्हरसीज स्टडी या नावाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ज्या माध्यमातून परदेशात शिक्षण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रयत्न केले जातात. याच कंपनीच्या माध्यमातून हा अपहार करण्यात आला आहे. डॉक्टरांची दोनही मुलांचे १२ वि पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये जुगनू कोळी याच्या माध्यमातून सिंगापूर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. यामुळे कोळी कुटुंबाबात डॉक्टर दाम्पत्याचा अधिक विश्वास संपादन झाला होता. मुलांचे सिंगापूर येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठामध्ये कमी खर्चाचेमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून, डॉक्टर दाम्पत्याचा होकार मिळवला. यासाठी त्याने प्रथम ७ लाख ५६ हजार रुपये डॉक्टर दांपत्याकडून काढून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ऐवजी जर्मनी येथे मुलांची व्यवस्था करतो आणि डॉक्टर दाम्पत्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून, ८८ लाख ५३ हजार घेतले. यांनंतर पुन्हा १ कोटी २७ लाख २६ हजार कोळी दांपत्याला दिले. यांनंतर या बंटी, बबलीने भारतीय चलनाचे युरो चालनामध्ये एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने आणखी २७ लाख असे आजपर्यंत ३ कोटी ३० लाख उकळले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news