

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षभरात लागलेल्या वनव्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वणवा विरोधी कायदा सक्षम नसल्याने त्यामध्ये वाढ होत असल्याचे चित्र 2025 च्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील वणवाच्या प्रकारात सुरवात झाली आहे.
गुरुवारी सकाळी लावण्यात आलेल्या वणव्याची झळ 12.45 च्या सुमारास जवळ असणाऱ्या घराजवळ आल्याने अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
महाड नगरपरिषद सह महाड औद्योगिक वसाहत च्या अग्निशमन कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत वणव्यावर तासाभरात निमंत्रण मिळविले त्या मुले मोठा धोका टळला आहे श्रीकांत बागडे याच्या वनराई घरा जवळ वणवा लागला होता तो वाऱ्याने पसरल्याने बागडे यांनी स्वतः पाणी मारण्यास सुरवात केली होती या मुले मोठी हानी टळली आहे.
पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांत सायंकाळी किंवा पहाटे च्या सुमारास गवत सह झाडाला पाला जळून जाण्यासाठी वणवा लावण्यात येत आहे मात्र वाऱ्याच्या वेगात वणवा सर्वत्र पसरत असल्याने अनेक दुर्दैवी घटना या पूर्वी तालुक्यात घडल्या आहेत गेल्या काही दिवसात तालुक्यातील डोंगर रांगांवर वणवे लावण्याचे सातत्य आजही कायम राहिले आहे.
डोंगरात पेटणाऱ्या वणव्यांमुळे येथील अनेक उपयुक्त वृक्षवेली नष्ट होऊ लागल्या आहेत.वणवा विरोधी कायदा असला तरी सक्षम पणे राबविला जात नसल्याने कायद्याचे भय नसल्याने गेल्या काही वर्षा पासून वनव्याचे प्रकार वाढत आहेत वणवा विरोधी कायदा कागदावर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित असल्याचे दिसून आले आहे.
जनजागृतीसह समाज परिवर्तन होणे गरजेचे
पोलादपूरातील बहुतांश गावातून गैरसमजातून व चुकीच्या परंपरेतून हे वणवे पेटवले जात आहेत. गवताच्या चांगल्या वाढीसाठी वणवे पेटवण्याचा गैरसमज येथील ग्रामीण भागात अनेक वर्षापासून आहे. मात्र, या कृतीला कुठलेही शास्त्रीय कारण स्पष्ट केले जात नाही. येथील शेतकरी भातपीक घेण्यासाठी तरवा तयार करतात. त्यासाठी गवत, पेंढा, कवळ, शेणाचा वापर केला जातो.
कवळ तोडीचा फटकाही झाडांना बसत आहे. तसेच तरव्यासाठी वणवे पेटवले जात आहेत. दरम्यान वारंवार लागणारे वनवे आणि यामुळे वन्यजीव प्राणी, पशुपक्षी यासह स्थावर, जंगम मालमत्तेचे होणारे नुकसान यासाठी वनवे रोखणे गरजेचे बनले असून वारंवार लागणारे वनवे रोखण्यासाठी जनजागृतीसह समाज परिवर्तन होणे गरजेचे बनले आहे.