

खोपोली ः दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकुरवाडीच्या रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पायपीट करून हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. या वाड्यांना दळणवळणासाठी रस्ता मिळावा यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने खोपोलीत बेमुदत उपोषण करत राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधले.या उपोषणाची दखल घेत येत्या पाच दिवसात प्रशासनासमवेत चर्चा करुन रस्त्याबाबत निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिले.
ग्रामसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासीवाड्यांतील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले होते. ही घटना समजल्यानंतर उपोषणस्थळी राष्ट्रवादी नेते सुधाकर घारे यांनी भेट घेतली.आणि आज ही आदिवाड्यावर नागरी सुविधा पोहचत नसतील आणि नागरिकांना त्यासाठी उपोषण करावे लागत असेल तर आपले दुर्दैव आहे असल्याचे सांगीतले.
घारे यांनीं तहसिलदार,वनविभाग अधिकारी,बांधकाम अधिकारी यांच्याशी संयुक्तपणे चर्चा करून पाच दिवसांत वनविभागाची मंजूरी प्राप्त करू असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेतले आहे.जर परवानगी वेळेत मिळाली नाहीतर राष्ट्रवादी पक्षही पुढील आंदोलन सहभागी असेल असा इशारा घारे यांनी दिला आहे.त्यामुळे उपोषणकर्त्यांनी तूर्तास उपोषणाला स्थगिती दिली आहे.
सुधाकर घारे यांनी तहसिलदार यांच्या कार्यालयात बैठक घेतली.याबैठकीला तहसिलदार अभय चव्हाण,नायब तहसिलदार सुधाकर राठोड,खालापूर वनाधिकारी राजेंद्र पवार ,जि.प.बांधकाम अभियंता आगलावे, यांच्यासह राष्ट्रवादीचे अंकीत साखरे, शरद कदम, संतोष बैलमारे, भूषण पाटील, कुमार दिसले, राजेश पारठे,सचिन कर्णूक, प्रसाद कर्णूक, प्रशांत शेंडे, राम जगताप ,खोपोली शहर युवक अध्यक्ष अल्पेश थरकुटे,प्रशांत शेंडे आदि उपस्थित होते.
तहसिलदार अभय चव्हाण,खालापूर वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी आपआपली कागदपत्रे पूर्ण करण्याचे अश्वासन दिले. जिल्हा वनक्षेत्र अधिकारी राहुल पाटील यांच्या सुधाकर घारे यांनी दूरध्वनीवरून संपूर्क साधून प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आहे.त्यानंतर पाच दिवसांत वनविभागाची मंजूरी प्राप्त करू असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्ते संतोष ठाकूर यांना सुधाकर घारे आणि नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी सरबत देवून उपोषण मागे घेतले आहे.
खालापूर तालुक्यातील 18 वाड्या आहेत त्याठिकाणी रस्ता,पाणी,वीज अशा मूलभूत गरजांपासून आदिवासी बांधव वंचित आहेत.खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकुरवाडीच्या रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पारतंत्र्यात असल्यासारखे आहेत.
उपोषण स्थळी भेट देवून तहसिलदार, नायब तहसिलदार सुधाकर राठोड,खालापूर वनधिकारी राजेंद्र पवार ,जि.प.बांधकाम अभियंता आगलावे आणि उपोषणकर्त्यांशी मध्यस्थी करून येत्या पाच दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे लेखी अश्वासन दिल्याने ठाकूर यांनी उपोषण मागे घेतला आहे.जर प्रस्ताव मंजूर झाला नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील आंदोलन सहभागी असेल असा इशारा घारे यांनी दिला आहे.
खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकुरवाडी या गावांना रस्ता मिळावा यासाठी ग्राम 4 वर्षपासून वन विभागासह जिल्हा प्रशासनाकडे विनंती अर्ज, आंदोलने,मोर्चे यांसह उपोषण करण्यात आले. तीन वर्ष उलटूनही वन हक्क कायदा 2006 चे कलम 3/2 नुसार या रस्त्यासाठी आवश्यक वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही.
खालापूर तालुक्यातील 18 वाड्या आहेत. त्याठिकाणी रस्ता,पाणी,वीज अशा मूलभूत गरजांपासून आदिवासी बांधव वंचित आहेत.खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकुरवाडीतील नागरिकांनी पाठपुरावा केला तरीही काम होत नसल्याने उपोषण केले आहे.प्रशासनाने लेखी अश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले आहे.खालापूर तालुक्यातील 16 वाड्या अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने सुधाकर घारे यांनी पाठपुरावा करावा.
संतोष ठाकूर, ग्रामसंवर्धन संस्था