Ganesh Idol: अलिबागच्या गणेशमूर्ती निर्मितीची विदेशींना भुरळ

परदेशातील युवकांची वाघ्रण येथील श्री गणेश चित्र शाळेला भेट, जाणून घेतली माहिती
Ganesh Idol
Ganesh IdolPudhari
Published on
Updated on

अलिबाग: महाराष्ट्रासह भारतात गणपती बाप्पाबद्दल जेवढी भक्ती, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि आकर्षण आहे तेवढेच कुतूहल परदेशातही आहे. म्हणूनच परदेशातून अनेक विद्यार्थी गणेशोत्सवापूर्वी भारतात येतात आणि उत्सव पाहून त्यांना आनंद मनात साठवून परत जातात.

याचाच भाग म्हणून नेदरलँड, जर्मनी, मलेशिया , मास्को व युरोप खंडातील देशांतून आलेल्या तरुणांनी अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील निर्भय अनंत धोदरे यांच्या श्री गणेश चित्रशाळेला भेट दिली.

Ganesh Idol
Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात सलग तिसऱ्यांदा दरड कोसळली

परदेशी तरुणांनी निर्भय अनंत धोदरे यांच्या श्री गणेश चित्रशाळेला भेट देऊन गणेशमूर्ती निर्मितीचे कौशल्य जवळून पाहिले आणि अभ्यासले. हे तरुण भारतातील संस्कृती, रितीरिवाज, खाद्यपदार्थ, व्यवसाय, सण, उत्सव यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले आहेत. आता दीड महिनाभरावर गणपती उत्सव आल्याने ते पाहण्यासाठी ही मंडळी अलिबागमध्ये आली होती.अलिबाग मधील कार्लेखिंड येथील प्रयास हॉस्पिटल चे डॉ.रविंद्र म्हात्रे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

गणेश चित्रशाळेला भेट दिल्यानंतर परदेशी युवकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहायला मिळाली. यावेळी मूर्तिकार निर्भय धोदरे, अनंत धोदरे, कृष्णा धोदरे आणि आकाश धोदरे यांनीही या युवकांना आवश्यक ती माहिती दिली.या वेळी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ हरिश्चंद्र पाटील,हेमंत पाटील, उपस्थित होते.

नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, मॉस्को,व युरोप येथून आलेल्या तरुणांची जगभर भटकंती सुरू आहे. ते विविध देशात भटकंती करून तेथील संस्कृती समजून घेत आहेत. जगातील युवकांना एकत्र जोडणाऱ्या लायन्स क्लबमार्फत देशोदेशींच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ही संकल्पना राबवली जाते.

Ganesh Idol
Matheran Municipal Chief Controversy: प्रलंबित नागरी समस्या सुटत नसल्याने माथेरानकरांमध्ये तीव्र नाराजी

यावर्षी अलिबाग लायन्स क्रुब मेंबर्सकडे असे परदेशी युवक आले. डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. रेखा म्हात्रे, यांनी या परदेशी युवकांना ही संधी उपलब्ध करून दिली. या युवकानी देशातील विशेषता अलिबागमधील डोंगर, झाडी, समुद्र आणि एकंदर वातावरण खूप आवडल्याचे सांगितले.

मूर्तिकाराकडून अस्सल मराठीत उत्तरे

संपूर्ण जगाला बाप्पाचे आकर्षण आहे. म्हणूनच चित्रशाळेतील गणरायाच्या विलोभनीय मूर्ती पाहून परदेशीयुवकांना अत्यानंद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी गणेशमूर्तीचा इतिहास, त्याच्या आभूषणांची माहिती मूर्तिकारांना विचारली. परदेशी तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना मूर्तिकारांनी मराठीत उत्तरे दिली. त्याचे इंग्रजी भाषांतर ऐकल्यानंतर त्या तरुणांच्याही मुखातून उत्सूर्तपणे 'गणपती बाप्पा मोरया' असा जयजयकार बाहेर पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news