

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यांच्या खारेपाटातील पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन असणारी मत्स्य तलाव संकल्पना आता संपूर्ण कोकणात साकारणार आहे. वर्षाला सुमारे पाच लाख रुपयांची व्यावसायिक उलाढाल असणार्या या मत्स्य तलावांच्या माध्यमातून कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये आर्थिक क्रांती घडवून आणण्याच्या हेतूने कोकणात एकूण एक हजार मत्स्य तलाव करण्याची योजना आखण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय महसुल आयूक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
अलिबाग तालुक्यांच्या खारेपाटातील शहापूर धेरंड गावांतील प्रत्येक शेतकर्याच्या गरा समोर मत्स तलाव आहे. 400 पेक्षा अधिक मत्स्य तलाव या गावांत आहेत. जिताडा या सुप्रसिद्ध या माशांचे उत्पादन येथे शेतकरी घेतात. जिताडा या माशांला बाजारात 800 ते 1200 रुपये किलो असा भाव मिळतो आणि त्यांतून जिताडा मत्स तलावधारक शेतकर्यांची वार्षीक आर्थिक उलाढाल तीन ते पाच लाखांच्या घरात होते. अत्यंत वैशिष्ठपूर्ण अशा या जिताडा तलावांच्या गावांचे जिताडा व्हिलेज करुन त्यांस पर्यटनाची जोड देण्याची योजना विद्यमान कोकण विभागीय महसुल आयूक्त आणि रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी शासनाकडे सादर केली होती. मत्य तलावांमध्ये शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीची मोठी क्षमता असल्याने ही मत्स्य तलाव संकल्पना संपूर्ण कोकणातील सर्व जिल्ह्यात अमलात आणण्याची निर्णय आयूक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी घेतला आहे.
कोकणा किनारपट्टीत अनेक गावे खाडी किनारी आहेत. पावसाचे प्रमाण देखील मोठे आहे. या पावसाच्या पाण्याचा उपयोग शेतीसोबत मत्स्यपालनासाठीही करता येतो. तसेच कोकणात शहापूर,धेरंड गावांप्रमाणेच खाडीतील पाण्याचा उपयोग देखील मत्स तलावाकरिता कराता येवू शकतो. कमी उत्पन्न देणार्या आणि लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीतून शेतकर्यांना पुरेशा प्रमाणात उत्पन्न मिळत नाही.
मत्स्य तलाव म्हणजे मासे वाढवण्यासाठी तयार केलेला कृत्रिम जलसाठा. यामध्ये मासे पोसण्यासाठी योग्य पाणी, अन्न व व्यवस्थापन असते. कोकणात मत्स्य तलाव उपयुक्त ठरतात कारण उच्च पावसाचे प्रमाण - तलाव भरण्यासाठी नैसर्गिक पाणी सहज उपलब्ध, शिवाय खाडीतील पाण्याची उपलब्धता आहे. कोकणातील उबदार हवामान मासे वाढीस पोषक, किनारपट्टीवरील लोकांना मासेमारीचा पारंपरिक वारसा आहे, शेतीबरोबरच मत्स्यपालन करून दुहेरी उत्पन्न आणि सरकारी अनुदानासह प्रशिक्षणाची उपलब्धता.
त्यात लांबणारा पाऊस, अतिवृष्टी आदि दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भातशेती करण्याचा कल अलिकडच्या काळात कमी होताना दिसून येत आहे. या परिस्थितीत तलावातील मत्स्यपालन व्यवसाय हा एक उत्तम उत्पन्नाचा पर्याय ठरत आह. विशेषतः शेततळी मत्स्य तलाव म्हणून वापरल्यास त्यांतून खात्रीशीर आर्थिक उत्पन्न मिळू शकते असा हेतू या योजने मागे आहे. कोकणात मत्स्य तलावांची निर्मिती केल्याने शेतकर्यांना केवळ भातशेतीवर अवलंबून राहावे लागणार नाही. वर्षभर कायमस्वरुपी अर्थप्राप्त होणार असल्याने शाशश्वत आर्थिक परिवर्तन घडून येणार आहे.
राष्ट्रीय मत्स्य विकास योजना.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना.
राज्य शासनाचे कृषी व मत्स्य विभाग अनुदान
मत्स्य प्रशिक्षण केंद्रे- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड
अल्प गुंतवणुकीत जास्त नफा
शेतीला पूरक व्यवसाय
स्थानिक रोजगार निर्मिती
प्रथिनयुक्त अन्नाच्या स्रोताची उपलब्धता.