Taloja Firing | तळोजात कंत्राटाच्या वादातून गोळीबार; दोघे गंभीर जखमी

लिफ्ट मेंटेनन्स आणि जुन्या आर्थिक व्यवहारांवरून वाद; लोखंडी रॉड, बांबूने मारहाण केल्यानंतर झाडल्या गोळ्या
Panvel Taloja Contract Dispute
Panvel Taloja Contract DisputePudhari
Published on: 
Updated on: 

Panvel Taloja Contract Dispute

पनवेल : लिफ्ट मेंटेनन्सचे कंत्राट मिळवण्यावरून आणि जुन्या आर्थिक व्यवहारांवरून झालेल्या वादातून तळोजा फेज-२ येथील शिवाजी चौक परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेपूर्वी आरोपींनी तिघांना लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने मारहाण केली. त्यानंतर पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात विशाल शिंदे आणि सचिन डांगे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संबंधित व्यक्ती यापूर्वी भागीदारीत लिफ्ट मेंटेनन्सची कंत्राटे घेत होत्या. मात्र, जुन्या आर्थिक व्यवहारांवरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर भागीदारी संपुष्टात आली. पुढे लिफ्ट मेंटेनन्सचे कंत्राट मिळवण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते.

Panvel Taloja Contract Dispute
Panvel crime news: खांदा कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून ५.४१ लाखांचा ऐवज लंपास

दरम्यान, मध्यरात्री विशाल शिंदे, सचिन डांगे आणि सौरभ डुंबरे हे तिघे तळोजा फेज-२ मधील शिवाजी चौकाजवळील मारवा इमारतीखाली उभे होते. यावेळी लिफ्ट मेंटेनन्सचे कंत्राट आणि जुन्या भागीदारीतील आर्थिक व्यवहारांवरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी तिघांना लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने मारहाण केली. त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार केला.

या हल्ल्यात विशाल शिंदे आणि सचिन डांगे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Panvel Taloja Contract Dispute
Panvel crime news: कामोठे बसस्टॉपवर चोरट्यांचा सुळसुळाट; बस पकडताना एकाची ४९ हजारांची रोकड, दुसऱ्याचा आयफोन चोरीला

या प्रकरणी तळोजा पोलिसांनी सागर डांगे, आकाश डांगे, गणेश लावरे, अनिकेत नरवाडे, रुद्र बारवकर आणि अन्य तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, या घटनेचा पुढील तपास तळोजा पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news