Raigad Pollution News | दिवाळीत फटाक्यांमुळे रायगडचा श्वास कोंडला!

Raigad Pollution News | माणगावमध्ये फटाक्यांचा धूर; वायू, ध्वनीसह जलप्रदूजनाचा वाढता धोका; आरोग्याचा प्रश्न एरणीवर
Raigad Pollution News
Raigad Pollution News
Published on: 
Updated on: 

माणगाव (अरुण पवार): निसर्गाचे वरदान लाभलेला रायगड जिल्हा आज वाढत्या प्रदूषण समस्याला सामोरे जात आहे. दिवाळीतील फटाक्यांची आतषबाजी, मुंबई-गोवा महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते बांधकामातून उडणारी धूल, वाढते नागरीकरण आणि औद्योगिक प्रदूषण यामुळे माणगावसह जिल्ह्यातील वातावरणावर ताण निर्माण होत आहे.

Raigad Pollution News
Raigad Sarasgad fort massive forest fire| सरसगडावर भीषण वणवा; वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी

विकासाच्या धावपळीत स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि निसर्गासंपदेचे संवर्धन मागे पडत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणातील आतषबाजीमुळे हवेत धूर आणि सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढते. PM2.5 आणि PM10 या सूक्ष्म कणांमुळे श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

रात्री उशिरापर्यंत वाजणाऱ्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूूषणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरण आणि आरोग्याचे भान राखणे आवश्यक बनले आहे. माणगाव बायपासचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांचा मोठा भार शहरातून जात आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात वाहनांच्या लांब लांब रांगा लागतात.

तासन्तास एकाच ठिकाणी अडकलेल्या वाहनांमधून बाहेर पडणारा धूर शहरातील हवेत मिसळतो. त्यातच महामार्गाच्या बांधकामातून उडणारी माती आणि सिमेंटची धूळ नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

प्रदूषणाची पातळीची पडताळणी आवश्यक

उपलब्ध ऑनलाइन नोंदीमध्ये रायगडचा AQI १५० ते १७५, तर माणगावचा ११३ ते १२४ दरम्यान असल्याचे नमूद झाले आहे. मात्र अधिकृत स्थानिक निरीक्षण केंद्राकडून या आकडेवारीची पडताळणी होणे आवश्यक आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी महामार्गावर नियमित पाणी फवारणी, वाहनांच्या धुराची तपासणी, नदीपात्रात सांडपाणी जाण्यापासून प्रतिबंध, कचऱ्याची शास्त्रीय व्यवस्थापन आणि औद्योगिक प्रदूषणणावर कठोर देखरेख या उपाययोजना प्रशासनाने प्रभावीपणे राबवाव्यात.

Raigad Pollution News
Raigad Sarasgad fort massive forest fire| सरसगडावर भीषण वणवा; वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी

माणगावची जीवनदायिनी असलेल्या काळ नदीत सांडपाणी मिसळणे, नागरी कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट आणि वाढत्या नागरीकरणामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रातील पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी आणि पृष्ठभागावर दिसणारे तरंग याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.

नदीचे अस्तित्व आणि जलचरंचे संरक्षण करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था प्रभावी करणे आवश्यक आहे. माणगाव, रोहा परिसरातील प्रस्तावित औद्योगिक प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कबाबत स्थानिक नागरिकांनी पर्यावरणीय परिणामाविषयी चिंता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.