रायगड : जयंत धुळप
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पांतर्गत देशातील नऊ राज्यांमध्ये १२ नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यात बात ३८ हजार कोटींची गुंतवणूक क्षमता असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा समावेश असून दिघी पोर्ट विकासासाठी केंद्र सरकारने ५४६९ कोटी रुपये मंजूर केले असल्याने केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सागरी व्यापारात मोठी क्रांती मडून येणार आहे.
मुरुड तालुक्यातील आगरदांडा आणि म्हसळा तालुक्यांतील दिघी यामधील डिपड्राफ्ट समुद्र क्षेत्रात असलेल्या दिपी पोर्ट इंटस्ट्रीयल एरीया (डीपीआयए) एकूण ६०५६ एकर क्षेत्रात विकसीत केले जाणार आहे. या विकास कामासाठी केंद्राने ५४६९ कोटी रुपये उपलब्ध केले असून या प्रकल्पाची गुंतवणुक क्षमता तब्बल ३८ हजार कोटींची राहाणार आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून एकूण १ लाख १४ हजार १८३ जणांना रोजगार मिळणार असल्याने स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर खण्या अथनि दिघी पोर्टच्या पूढील कामास गती देण्याकरिता तत्काळ उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग सचिव अमरदीप सिंग यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ सनदी अधिकायांनी येथे येऊम पहाणी करुन केंद्र सरकारला आवश्यक अहवाल देखील सादर केला आहे.
महाराष्ट्रातील औद्योगिक जोडणी परीक्षेत्र असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत दिपी पोर्ट इंटस्ट्रीयल एरीया (डीपीआयए) चा समावेश केलेला आहे. मुंबई शहरापासून दक्षिण दिशेला १७० किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर हे क्षेत्र वसलेले आहे कोकण रेल्वे मार्ग जवळ असल्याने या क्षेत्राला दळणवळणाच्या दृष्टीने दुहेरी लाभदायक ठरणार आहे.
रायगड जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या 'डीआयपीए 'वे विकासाच्या दृष्टीने एकूण क्षेत्र ६००५६ एकर निक्षित केले आहे. रोहा ते दिघी पोर्ट या नवीन रेल्वे मार्ग करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे सुविधेमुळे डेडिकेटेड फ्रेट कोरीडोर (डीएफसी) आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट यांच्याशी जीडले जाण्याची दुहेरी संधी उपलब्ध आहे. या टिकाणी ३८ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून १ लाख १४ हजार रोजगार उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये अभियांत्रिकी, अन व प्रक्रिया उद्योग तसेच रासायनिक उद्योग, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्यांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.
७ एमएमटीच्या एकूण क्षमतेसह स्टोरेज यार्ड
अतिरिक्त साठवण क्षेत्र २,००,००० ची, मीटर
कोळसा, बॉक्साईट, स्टील कॉइल साठवण्याची व्यवस्था
४५ हजार चौरस मीटरमध्ये पसरलेले बंदिस्त गोदाम
३६५ दिवस चालू राहाणारे बंदर
डिस्पॅच होईपर्यंत बर्थिग, स्टीव्हडोरिंग, बैंक-अप सताळणीशी संबंधित सर्व कामांसाठी दिघी पोर्टद्वारे सिंगल विडी सेवा
प्रकल्पांसासाठी जलमार्गदेखील सुलभ असून विविध बंदरे जवळ आहेत. जेएनपीए बंदर १०४ किलोमीटर, मुंबई पोर्ट १५३ किलोमीटर आणि दिघी पोर्ट ५५ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पांच्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यास बंदरांशी संलय औद्योगिकीकरण असल्याने त्याचा फायदा येथील कंपन्यांना होणार आहे.
भौगोलिक रचनेच्या दृष्टीने या क्षेत्राला दळणवळणाच्या व्यापक सुविधा उपलब्ध राहाणार आहेत. रस्ते मार्गाचा विचार केल्यास राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ माणगाव-पुणे तसेच राष्ट्रीय महामार्ग ६६. मुंबई-गोवा महामार्ग हा या क्षेत्रापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर अंतर्गत हे औद्योगिक क्षेत्र होणार असले तरी यामध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा आणि माणगावमधील जवळपास नऊ गार्चाचा समावेश होणार आहे. या ९ गावांचा विकास एनआयसीडीसी करणार असून १३ गावांचा विकास एमआइडीसी करणार आहेत. औद्योगिक क्षेत्र प्लग अँड प्ले धर्तीवर असणार आहे.