Raigad monsoon tourism : देवकुंड, सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी पर्यटनाला "लॉक"

१ किमी परिसरापर्यंत ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशबंदी लागू
Raigad monsoon tourism
Raigad monsoon tourismpudhari photo
Published on
Updated on

माणगाव : कमलाकर होवाळ

पावसाळ्यात वाढणारी पर्यटकांची गर्दी, अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह, दरड कोसळण्याचा धोका आणि यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांची गंभीर दखल घेत माणगाव उपविभागीय प्रशासनाने प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट परिसरात कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

हा आदेश १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रभावी राहणार असून या कालावधीत संबंधित परिसरातील सुमारे एक किलोमीटरच्या हद्दीत प्रवेशासह विविध कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर निरूत्साहाचे पाणी पडले आहे.

Raigad monsoon tourism
Sarwade Mall Fire | सरवडे येथील मॉलला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

माणगाव उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी हा आदेश जारी केला आहे. पावसाळ्यात या परिसरात नैसर्गिक धोक्यांमुळे पर्यटकांच्या दरडी कोसळण्याची शक्यता, धोकादायक वळणे आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे दुर्घटनांचा धोका कायम असतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Raigad monsoon tourism
Shivshahi bus fire Thane : शिवशाही बसला ठाणे सॅटीस पुलावर आग

दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

देवकुंड परिसरातील यापूर्वीच्या दुर्घटनांचा इतिहासही चिंताजनक आहे. २०१७ च्या पावसाळ्यात चार पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून मृत्युमुखी पडले होते, तर अचानक पाण्याची पातळी वाढल्याने सुमारे ५५ पर्यटक नदी पात्रात अडकले होते. त्यानंतर २०१८ मध्ये मनाई आदेश संपल्यानंतर तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला, तर २०२२ मध्येही एका पर्यटकाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला होता.

'कलम १६३' अंतर्गत या गोष्टींवर बंदी

देवकुंड, सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट व परिसरातील धबधब्यांमध्ये प्रवेश. धबधबे, खोल पाणी किंवा वेगवान प्रवाहात उतरणे अथवा पोहणे. धबधब्याच्या माथ्यावर जाणे किंवा पाण्याच्या जोरदार प्रवाहाखाली बसणे. धोकादायक ठिकाणी सेल्फी, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग किंवा रिल्स तयार करणे. मद्यपान करून किंवा मद्य बाळगून परिसरात प्रवेश करणे तसेच अनधिकृत मद्यविक्री. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे, स्पीकर किंवा वाहनांवरील साउंड सिस्टीम वाजविणे. महिलांची छेडछाड, अश्लील वर्तन, टिंगलटवाळी किंवा सार्वजनिक शांततेचा भंग करणारे कृत्यावर पूर्णपणे बंदी घातली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news