

महाड ः श्रीकृष्ण बाळ
बाप लेकीचं नातं अनोखं असतं. आपली लेक ही बापासाठी सर्वांत मोठा आनंद असतो. दोघांचाही एकमेकांवर अफाट जीव असतो. वडील आणि मुलीच्या नात्यात एक वेगळ्याच प्रकारचा भावनिक ओलावा असतो. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे ‘हिरो’च असतात. आपल्या या हिरोसाठी मुलगी काहीही करू शकते. मग ती मुलगी सामान्य कुटुंबातील असो किंवा प्रसिद्ध राजकारणी घराण्यातील.
लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. याच ओळी खर्या करुन दाखवणार्या आज असंख्य तरुणी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आधार देत आहेत अशीच एक घटना महाड तालुक्यातील चिंभावे गावातील प्रतिष्ठित घराणे जयवंत दळवी याच्या बाबत घडली आहे . जयवंत दळवी यांना 22 वर्षीय मधुरा या मुलीने यकृत देत वडिलांना जीवदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लिव्हरच्या या प्रत्यारोपण बाबत मधुराचे सर्वत्र कौतुक होत असून हे फक्त एक कन्याच करू शकते व वंशाचा दिवा चालवू शकते, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया संपूर्ण महाड तालुक्यातून व्यक्त होत आहेत.
एका मुलीने तिच्या आजारी वडिलांना लिव्हर दान केले. खरे तर वडील बर्याच दिवसांपासून लिव्हरच्या आजाराशी झुंज देत होते. मुलीचे मन आपल्या वडिलांच्या आजाराने कशात लागत नव्हते, शेवटी तिने आपल्या वडिलांसाठी लिव्हर दान करत आपले जीवन सार्थकी लावत कर्तव्यपूर्ती करून जगाला एक मुलगी आपल्या पित्या साठी काय करू शकते हे दाखवून दिले. मुलगी पाहिजे या विषयावर खूप चर्चा होते. ती जुन्या पिढीच्या चालीरिती प्रमाणे जपली जाते. आजही मुली पेक्षा मुलगा वंशाचा दिवा म्हणून मानला जातो.मात्र महाड तालुक्यातील 22 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना जीवनदान देत वंशाचा दिवा मुलगी चालवू शकते हा संदेश दिला आहे.
चिंभावे गावचे माजी सरपंच प्राजक्ता जयवंत दळवी व जयवंत शशिकांत दळवी यांची मोठी मुलगी मधुरा हिने स्वतः चे लिव्हर देऊन बापाला जीवदान दिले. मधुराचे अवघे वय 22 वर्ष आहे , विशेष म्हणजे आई माजी सरपंच व भाजपा मंडळ अध्यक्ष महिला मोर्चा महाड व वडील माजी सरपंच, तथा भाजप उपाध्यक्ष रायगड जिल्हा श्री जयवंत दळवी यांची हे दोघेही भाजप चे यशस्वी पदाधिकारी आहेत. जयवंत याच्यावर एच एन हॉस्पिटल रिलायन्स फोऊडेशन मुंबई येथे उपचार चालू होते.
जयवंत याच्यावर डॉ प्रशात कदम ,डॉ गौरव गुप्ता डॉ आकाश शुल्का यांनी लिव्हर प्रत्यारोपण ची प्रकिया पार पाडली . या वैद्यकीय उपचार दरम्यान दळवी यांना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी सहकार्य करत दळवी याचे मनोबल उचविले. आपल्या वडिलांसाठी लिव्हर प्रत्यारोपणास सिद्ध आलेल्या मधुराचे सर्वत्र गाजत कौतुक होत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलींना व महिलांना विशेष करून आपल्या लाडक्या बहिणीसाठी स्वतंत्र योजना सुरू करून त्यांच्या मनात शासनाविषयी विशेष स्थान निर्माण केले आहे. जयवंत दळवी यांची सुकन्या मधुरा सारखे धैर्य इतरांना मिळावे तसेच आपल्या लाडक्या पित्यासाठी तिने केलेल्या लिव्हर प्रत्यापणाची शासन दरबारी नोंद घ्यावी, अशी मागणी जयवंत दळवी यांच्याशी संबंधित असणार्या मित्रपरिवारातर्फे करण्यात आली आहे.
मधुरा उच्चविद्याविभूषित
मधुरा जयवंत दळवी ही 22 वर्षीय युवती प्रेरणा महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरच्या तिसर्या वर्षांमध्ये विद्याभ्यास करीत आहे. तिने राज्य व केंद्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती जयवंत दळवी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
आपल्या लाडक्या कन्येने दाखवलेले हे धाडस आपल्याला पुनर्जन्माचा साक्षात्कार देणारे ठरले असून पुढील आयुष्यात आपण समाजातील सर्व घटकांप्रती अशा कठीण आजारातून मार्ग काढण्यासाठी वचनबद्ध राहणार.
जयवंत दळवी, चिंभावे